युवक नेते अक्षय देशपांडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश त्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास

0
युवक नेते अक्षय देशपांडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश
त्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास 

प्रतिनिधी पंढरपूर : नागेश काळे 

पंढरपूर शहरातील उत्पात गल्ली,गांधी रोड,टोनी गारमेंट समोरील बोळामध्ये कचराकुंड आणि मुतारी असल्याने सर्व कचरा रस्त्यावर पडलेला असतो तसेच परिसरात मटाची संख्या जास्त असल्याने तेथे येणारे असंख्य वारकरी कचराकुंडीमध्येच शिल्लक अन्न टाकतात आणि कचराकुंडी शेजारी मुतारी असल्याने तेथे दुर्गंधी पसरते तसेच सर्व नागरिकांना कचऱ्यामधूनच प्रवास करावा लागतो,मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य झाले होते.
त्यामुळे तेथील नागरिकांना नाहक त्रास होत होता. त्याचीच दखल घेत युवक नेते पंढरपूर शहर भाजप उपाध्यक्ष अक्षय देशपांडे मित्रपरिवार यांनी आक्रमक पवित्रा घेत तेथून कचरकुंडी काढून टाकावे यासाठी आज पंढरपूर नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी सुनीलजी वाळूजकर यांना निवेदन देऊन पालिका प्रशासनाला इशारा दिला होता त्याच बरोबर त्यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा देखील दिला होता युवक नेते अक्षय देशपांडे यांच्या त्या प्रश्नाची दखल घेत उपमुख्यअधिकारी सुनीलजी वाळूजकर साहेब यांनी तातडीने आरोग्य विभागाचे कामगार बोलून उत्पात गल्ली,गांधी रोड,टोनी गारमेंट समोरील बोळ येथील कचराकुंडी काढून टाकले टाकली
 आणि तो परिसर स्वच्छ केला तसेच प्रभागातील नागरिकांनी घंटागाडी मध्ये कचरा टाकावा रोडवर टाकू नये अन्यथा शासकीय नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा उपमुख्य अधिकारी सुनील वाळूजकर यांनी दिला आहे आणि प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतल्याने युवक नेते अक्षय देशपांडे यांचे आभार मानले आहे. मागील अनेक दिवसापासून तेथील कचराकुंड काढण्यासाठी आणि रस्ता स्वच्छ ठेवण्यासाठी अक्षय देशपांडे हे नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून हालचाली करत होते 
त्याचीच दखल आज पालिका प्रशासनाचे उपमुख्य अधिकारी सुनीलजी वाळूजकर यांनी घेतले असल्याने अक्षय देशपांडे यांच्याकडून पालिका प्रशासनाचे कौतुक होत आहे.
 यावेळी अक्षय देशपांडे सह आनंद नगरकर सर,युवराज अष्टेकर गौरव देशपांडे अंबादास कबादे,सचिन सोळंकी, रोहित जाधव,संतोष खिलारे, अक्षय देशपांडे मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !