शिवसेना (शिंदे गट) पंढरपूर शहर समन्वयक पदी महेश कदम यांची निवड
पंढरपूर प्रतिनिधी:-
शिवसेना (शिंदे गट) पंढरपूर शहर समन्वयक पदी महेश कदम यांची निवड झाली असून त्यांच्या निवडीचे पत्र शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत( सर )यांनी आज दिले. महेश कदम यांची निवड जाहीर केली.
महेश कदम शिवसेनेमध्ये मागील 25 वर्षापासून कार्यरत असून यापूर्वी त्यांनी शिवसेना पंढरपूर शहर उपशहर प्रमुख म्हणून काम केले होते. शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाच्या उपजिल्हाप्रमुख पदी त्यांची निवड झाली होती.
आता शिवसेनेच्या (शिंदे गट) शहर समन्वयक पदी त्यांची निवड झाली असून शहरातील सर्व स्तरात त्यांचे अभिनंदन होत आहे.
यावेळी भैरवनाथ शुगरचे अनिल (दादा) सावंत ,पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख चरण राज चवरे ,उपजिल्हाप्रमुख महावीर (नाना) देशमुख, तालुकाप्रमुख शिवाजीराजे बाबर ,शहर प्रमुख मुन्ना भोसले ज्येष्ठ शिवसैनिक गंगाधर माने उपस्थित होते.