गांधीगिरी मार्गाने ऊस दर संघर्ष समितीचे आंदोलन सुरू!
(३१००/-रूपये फायनल पेमेंट मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही:-ऊस दर संघर्ष समिती)
पंढरपूर-ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने पंढरपूर येथे नुकतीच भव्य ऊस परिषद पार पडली. त्यामध्ये या वर्षीच्या उसाची पहिली उचल व फायनल दराची मागणी करण्यात आली 2500 रुपये पहिली उचल आणि 3100 रुपये फायनल ऊस दर तोडगा निघेपर्यंत ऊसतोड ऊस वाहतूक करू नये सर्व कारखानदारांनी उसाची पहिली उचल जाहीर करूनच साखर कारखाने सुरू करावे असे आवाहन करण्यात आले आहे परंतु ट्रॅक्टर मालक शेतकऱ्याच्या आंदोलन मोडीत काढण्याच्या दृष्टीने वारंवार सांगूनही ऐकायला तयार नाहीत आज ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांना गुलाब पुष्प हार फेटा बांधून त्यांचे पाय धरून सांगितले शेतकऱ्याच्या घामाला दम मिळेपर्यंत थोडासा संयम पाळावा सर्व तुम्हीच तोडून येणार आहात परंतु गडबड केली तर शेतकऱ्यांना दर मिळणार नाही त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती करण्यात येते आणि एक स्तरातून शेतकऱ्यांना लुटण्याचे काम सुरू आहे...
अनेक जण संघर्ष समितीला सांगत आहेत ट्रॅक्टरचे नुकसान करू नका टायर फोडू नका ती शेतकऱ्याची पोर आहेत परंतु वारंवार आवाहन करून विनंती करून हात जोडून पाय धरूनही हे ट्रॅक्टर मालक शेतकऱ्यांना दर मिळावा म्हणून का थांबत नाहीत ही शेतकऱ्याची पोर आहेत तर मग उसाला दर मिळण्यासाठी ऊस वाहतूक का थांबवत नाहीत त्यांना शेतकऱ्याची पोर कसं म्हणायचं ???
यावेळी ऊस दर संघर्ष समितीचे श्री.दिपक भोसले, श्री.समाधान फाटे, श्री.माऊली हळणवर, श्री.सचिन पाटील, श्री.माऊली जवळेकर, श्री.नामदेव कोरके,श्री.नवनाथ मोहिते, विश्रांती भुसणर सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते...