टँकरचा बॉम्ब सारखा स्फोट ; युवती चा उरला फक्त सांगड; 7 मुलांसह 22 जण जखमी
टँकर झिरनियाकडे जात होता. टँकर उलटल्यानंतर सुमारे दोन तासांनी हा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.
मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये बुधवारी पहाटे पेट्रोल-डिझेलने भरलेला टँकर उलटला. या अपघातानंतर घटनास्थळावर ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर टँकरमध्ये मोठा स्फोट झाला. हा अपघात इतका भीषण होता की, २० वर्षीय तरुणीचा केवळ सांगाडाच वाचला. तसेच तेथे उपस्थित २२ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
बिस्तान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोगरगाव-गढी मार्गावरील अंजनगाव गावात हा अपघात झाला. येथे वळण रस्त्यावर टँकर अनियंत्रित होऊन उलटला. चालक व क्लिनर फरार आहेत. टँकर झिरनियाकडे जात होता. टँकर उलटल्यानंतर सुमारे दोन तासांनी हा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.
पोलिसांनी जखमींना १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात नेले. जखमींमध्ये ७ लहान मुले आणि १३ महिला व पुरुषांचा समावेश आहे. ८ जण गंभीर असून त्यांना इंदूरला रेफर करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कुमार पुरुषोत्तम आणि एसपी धरमवीर सिंह यादव जिल्हा रुग्णालयात पोहोचले. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, गंभीर लोकांना उपचारासाठी इंदूरला पाठवण्यात आले आहे. BPCL च्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्यांची टीम खांडव्याहून रवाना झाली आहे. ते या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतील.