गुजरात पूल दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती

0
गुजरात पूल दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू  मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती 

प्रतिनिधी : रविवारी गुजरातमध्ये मोठी दुर्घटना घडली. गुजरातच्या राजकोटमधील मोरबी भागात पूल कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. यादरम्यान पुलावर उभे असलेले शेकडो लोक मच्छू नदीत पडले. मिळालेल्या माहितीनुसार, मोरबी दुर्घटनेत आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू झाला आहे. यात महिला, लहान मुलं आणि वृद्धांचाही समावेश आहे. या अपघातात 177 जणांना वाचवण्यात यश आलं असून 19 जखमींवर मोरबी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
गुजरातच्या माहिती विभागाने ही माहिती दिली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष संघवी मोरबीमध्ये उपस्थित आहेत. गुजरात निवडणुकीच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमधील आपला रोड शो रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

गुजरात सरकारने मोरबी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. मच्छू नदीत पडलेल्या लोकांना वाचवण्यासाठी पथके कार्यरत आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.

Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !