वर्षा उसगावकर यांनी मागितली कोळी बांधवांची माफी। त्यांची ती पोस्ट चर्चेत।

वर्ष उसगावकर यांनी मागितली कोळी बांधवांची माफी। त्यांची ती पोस्ट चर्चेत। 

ऑनलाईन अॅपवरून मासे खरेदीची जाहीरात करताना मासे विक्रेत्यांविरोधात बोलणं अभिनेत्री (Varsha Usgonkar) वर्षा उसगावकर यांना चांगलच भोवलेलं आहे. त्यांच्या वक्तविरोधात मच्छिमार असोसिएशनने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट करुन मासेविक्रेत्यांची माफी मागितली आहे.

ऑनलाइन ॲपवर मासे (Fish) विकणाऱ्या कंपनीबाबत जाहीरातीचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी ॲपवरून मासे खरेदी करण्याचं आवाहन केलं. तर, "मला अनेकदा शिळे आणि वास येणारे मासे दिले गेले" असंही त्यांनी म्हण्टलं. या वक्तव्यावरून मच्छिमार असोसिएशनने आक्षेप घेतला होता. अखेर मच्छिमारांच्या वाढता रोष पाहता वर्षा उसगावकर यांनी मच्छिमार बांधवांची माफी मागतली आहे.

"कोळी समूहाच्या भावना मी अनवधानाने दुखावल्या असतील तर त्यांची मी माफी मागते. माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे", असं त्यांनी म्हणत त्यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post