रुग्णहक्क समिती वतीने यशवंत पवार यांचा सत्कार
सोलापूर ( प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील पत्रकारांसाठी
*प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा*
*ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना*
*राज्यातील पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना*
*शासकीय यादीवर नसलेल्या राज्यातील सर्वच वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती मिळणे*
*राज्यातील पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांची स्वतंत्र सक्षम अधिकाऱ्यामार्फत चौकशी करणे*
*राज्यातील सर्वच युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता*
*राज्यातील पत्रकारांचे शासन दरबारात नोंदणी*
*कोरोना संक्रमण काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भरघोस मदत*
यासह राज्यातील पत्रकारांच्या विषयावर पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आंदोलन उपोषण व निवेदन च्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न सोडवत असल्याने रुग्ण हक्क समिती वतीने सोलापूर येथे यशवंत पवार यांचा शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला
*हा सन्मान माझा नसून सर्वच पत्रकारांचा*
सत्काराला उत्तर देताना प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी हा सन्मान माझा नसून सर्वच पत्रकारांचा असल्याचे आवर्जून सांगितले
राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती गेली अनेक वर्षापासून संघर्ष करत असून या संघर्षामध्ये अनेक पत्रकार सहभागी आहेत खऱ्या अर्थाने त्या पत्रकारांचा सन्मान आहे असं यशवंत पवार म्हणाले
यावेळी रुग्ण हक्क समितीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुमित भांडेकर सरचिटणीस अमर कजाकवाले उपाध्यक्ष राजाभाऊ पवार सुजित उमाप जिल्हा सह संघटक गणेश बिलोटीवाले जिल्हा चिटणीस अकबर शेख शहर अध्यक्ष दुर्योधन भडकुंबे शहर उपाध्यक्ष इंद्रजीत गायकवाड सरचिटणीस लालसाब पटेल दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष प्रवीण चांदेकर निलेश हुलजंतीवाले धर्मराज चौधरी विकी फटफटवाले दरवेश शेख शहर चिटणीस यांच्यासह रुग्ण हक्क समितीचे अनेक सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते
Tags
Top news