पंढरपूर सिंहगडच्या प्रविण इंगवले यांची ज्युनिअर इंजिनिअर पदी इंडियन रेल्वेत निवड
पंढरपूर: प्रतिनिधी
रेल्वे भरती बोर्ड, मुंबई भारत सरकारच्या रेल्वे बोर्ड अंतर्गत कार्यरत असलेल्या रेल्वे भरती बोर्ड च्या ज्युनिअर इंजिनिअर पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागात शिक्षण पुर्ण केलेल्या सांगोला येथील प्रविण प्रकाश इंगवले यांची ज्युनिअर इंजिनिअर पदी निवड झाली असल्याची माहिती इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिली.
रेल्वे विभागाकडून २०१९ मध्या घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल ६ सप्टेंबर २०२२ रोजी जाहीर झाला. या परिक्षेत प्रविण इंगवले यांनी यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्याना ध्येयाकडे प्रेरित करणारे शिक्षक व शिक्षण व्यवस्था पंढरपूर सिंहगड मध्ये असून अल्पावधीतच सातत्यपूर्ण, उत्कृष्ट शैक्षणिक निकाल व प्लेसमेंटमध्ये अग्रेसर असणारे पंढरपूर सिंहगड महाविद्यालय आहे.
रेल्वे मध्ये निवड झालेल्या प्रविण इंगवले यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. संदीप लिंगे, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.