नवरात्र/उपवासाचे दिवसांत उपवासाचे पदार्थाबाबत घ्यावयाची काळजी
सद्या राज्यात नवरात्री उत्सव हा दिनांक 26.09.2022 ते 05.10.2022 पर्यंत असल्याने भाविकांमार्फत श्रध्देचा भाग म्हणुन उपवास ठेवण्यात येतो व उपवासाच्या काळात बऱ्याचदा भगरीचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्याबाबत अन्न व औषध प्रशासन, म. राज्य यांच्यामार्फत नागरीकांना अवाहन करण्यात येते की,
1. भगर व इतर पदार्थ खरेदी करतांना परवाना/नोंदणीधारक पेढीतुनच खरेदी करावे.
2. पॅकबंद असलेले भगर/उपवासाचे पदार्थच विकत घ्यावेत.
3. सदर पॅकेटवर उत्पादकाचा तपशील, बॅच नंबर, इत्यादी तपासुन खरेदी करावेत.
4. पॅकेटवर प्रक्रिया उद्योगात भगरीचे उत्पादन केव्हा झाले याचे तपशील असतो तो निट पाहुन घ्यावे, त्यासह बेस्ट बिफोर म्हणजे भगरीचे अंतिम वापरण्याची मुदत केव्हा कालबाह्य होते ते हि तपासुन व खात्री करुनच खरेदी करावी
5. भगरीचे सुटे पिठ खुल्या बाजारातुन/हातगाडीवरुन विकत घेऊ नये, बाजारातुन पॅकबंद भगर खरेदी केल्यावर ती स्वच्छ धुवुन त्यानंतरच घरगुती पध्दतीने पीठ तयार करावे.
6. खरेदी केलेल्या भगरचे विक्रेत्याकडून पक्के खरेदी बिल घ्यावे.
7. सकाळी बनविलेली भगर संध्याकाळी/रात्री शिळी झाल्यानंतर तिचे सेवन करण्यात येवू नये.
8. भगर व इतर उपवासाचे अन्न पदार्थ बनविताना स्वच्छ वातावरणात तयार करावेत व ते तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचाच वापर करण्यात यावा.
(प्र. मा. राऊत )
सहाय्यक आयुक्त (अन्न)
अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, सोलापूर.