पंढरपूर प्रतिनिधी :
विठ्ठल रुक्मिणी सभा मंडपात भजन ,कीर्तन व नामजपाला बंदी घालणारे मंदिर समिती चे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्यावर होणार कारवाई मंदिर समितीचा अतिरिक्त पदभार अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य वै. विठ्ठल महाराज घुले यांच्या स्मरणार्थ चालू असलेला नाम जप सप्ताह कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी बंद करण्यात भाग पाडले होते तसेच मंदिरात भजन कीर्तन करण्यास बंदी घातली होती अशी भाविकांची, वारकरी संघटनाची तक्रार होती.भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले शेकडो वर्षांपासून चालू असलेली ही परंपरा गजानन गुरव यांनी बंद पडली,या घटनेची माहिती त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना समक्ष भेटून दिली होती.या घटनेमुळे भाविक आणि वारकरी संप्रदायात संताप प्रतिक्रिया निर्माण झाल्या होत्या आणि ठीकठिकाणी मंदिर समिती व गजानन गुरव यांचा निषेध करण्यात येत होता. परंपरेत खंड पाडून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात येत होती. राज्यात शिंदे फडणवीस यांचे हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर असतानाही मंदिरातच भजन कीर्तन नामजपला बंदी घातली गेली या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली .भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी गजानन गुरव यांना तात्काळ हटवण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती.कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांना न हटवल्यास मनमानी कारभार करत परंपरा मोडणाऱ्या अधिकाऱ्याला सरकार पाठीशी घालत असल्याचा चुकीचा संदेश वारकरी व भाविक मंडळात जाईल या मागणीची दखल घेत याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी सोलापूर यांना पाठवण्यात आला असून गजानन गुरव यांच्याकडे असलेला मंदिर समितीचा अतिरिक्त पदभार सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे अशी माहिती मिळताच वारकरी संप्रदाय तसेच विठ्ठल भक्तांनी या कारवाईचे स्वागत केले