वाळू माफियान विरोधात पंढरपूर ग्रामीण पोलिसांची कारवाई

वाळू माफियान विरोधात पंढरपूर ग्रामीण पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी : पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील आज दि.11/09/2022 रोजी सकाळी 07/15 वा. चे सुमारास मौजे, तिसंगी ता. पंढरपुर येथील पांडुरंग केशव आहेरकर यांचे घराचे समोर एक पांढ-या रंगाची पिकअप अवैद्य वाळू खाली करीत असल्याची माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस ठाणेकडील स्टाफ गेला असता सदर पिकअप मधिल वाळु खाली करुन जात असताना यातील पिकअप चालक नामे 1) अशोक सुखदेव शिनगारे 2) तुषार राजेद्र सलगरे दोघे रा. मांजरी ता. सांगोला यांनी पोलीसांना धक्काबुकी करून जात असताना तिसंगी गावातील आण्णासाहेब पाटील हायस्कुल समोर पकडले आहे. तरी सदर बाबत पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं 414/2022 भा.द.वि. कलम 353,379,34 गौणखनिज अधिनियम कलम 4(1).4(1)(क). 21 प्रमाणे वरील दोन्ही आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील पिकअप वाहन व वाळु गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आली असुन यातील आरोपी नामे 1) अशोक सुखदेव शिनगारे वय 46 व्यवसाय हॉटेल चालक रा. मांजरी ता. सांगोला यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते सोलापुर ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधिक्षक हिमंत जाधव सोलापुर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पंढरपुर विभाग पंढरपुर, पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे याचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांनी केली असुन सदर गुन्हयाचा तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब कर्वे करीत आहेत. वाळु चोरांना कठोर कारवाईचा ईशारा पोलीस निरीक्षक धनजंय जाधव पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post