सिंहगड कॉलेज रोटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ

सिंहगड कॉलेज रोटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ

पंढरपूर: प्रतिनिधी 

 रोटरी क्लब ऑफ पंढरपुर पुरस्कृत, रोटरॅक्ट क्लब ऑफ सिंहगड कॉलेज २०२२-२३ या कालावधीत च्या नुतन अध्यक्ष व संचालकांच्या पदग्रहण समारंभ शनिवार दिनांक १० सष्टेंबर रोजी सिंहगड कॉलेज मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
   रोटरॅक्ट क्लब ऑफ सिंहगड कॉलेजच्या अध्यक्षापदी रोटरॅक्ट समृद्धी ताठे, सचिव पदी रोटरॅक्ट विश्वजीत कस्तुरे तर खजिनदार रोटरॅक्ट हसन शेख यांची निवड करण्यात आली. 
या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ प्रसंगी रो. संजय बोरा (DRCC), सन्माननीय अतिथी रोटरॅक्ट प्रसाद वारद (DRR) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
  सिंहगड रोटरॅक्ट क्लब च्या माध्यमातून विविध सुविधा, कौशल्य विकास, सामाजिक उपक्रम आदी महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवले जातील असे मत नुतन अध्यक्षा समृद्धी ताठे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
 या कार्यक्रमास पंढरपूर रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. कैलाश करांडे, सचिव रो. सचिन भिंगे, रो. किशोर सोमाणी, रो. दिपकभाई शहा, रो. संजय कपडेकर, अँड. राजेंद्र केसकर व सर्व रोटेरियन्स सह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरॅक्ट क्लबच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post