पंढरपूर सिंहगड मध्ये अँप्लीकेशन डिलिव्हरी नेटवर्क" या विषयावर कार्यशाळा संपन्न

पंढरपूर सिंहगड मध्ये अँप्लीकेशन डिलिव्हरी नेटवर्क" या विषयावर कार्यशाळा संपन्न

पंढरपूर: प्रतिनिधी 

 एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मधील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शुक्रवार दिनांक २३ सप्टेंबर २०२२ रोजी "अँपलीकेशन डिलिव्हरी नेटवर्क" या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती ही कार्यशाळा मोठ्या उत्साह संपन्न झाल्यास त्याची माहिती कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांनी दिली. कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी नितीन कुलकर्णी यांचे अँप्लीकेशन डिलिव्हरी नेटवर्क या विषयावर मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेत नितीन कुलकर्णी यांनी नेटवर्क सेक्युरिटी, बेसिक कन्सेप्ट, एखाद्या हॅकरला जर सायबर क्राईम करायचा असेल तर त्याला किती खोलात जाऊन अभ्यास करावा लागतो हे खूप सोप्या पद्धतीने सांगितले. 
ही कार्यशाळा कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय,तृतीय आणि चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होती. या कार्यशाळेत काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील १५० हून अधिक विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना भविष्यात करिअर करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण हि उपस्थित माहिती या कार्यशाळेत देण्यात आली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. पुनम गवळी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन प्रा. नामदेव सावंत यांनी मानले. हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कॉम्प्युटर अँड सायन्स इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post