स्वेरीमध्ये प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंगच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनला प्रचंड गर्दी

स्वेरीमध्ये प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंगच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनला प्रचंड गर्दी

पंढरपूरः गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी  संचलित पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरिंग प्रवेश २०२२-२३ साठी  फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.क्रमांक ६२२०)ची प्रक्रिया बुधवार, दि.२१ सप्टेंबर २०२२ पासून सुरु झाली आहे. ही प्रक्रिया मंगळवार, दि.०४ ऑक्टोबर २०२२ (सायं. ४.०० वाजेपर्यंत) चालणार आहे. या रजिस्ट्रेशन प्रक्रियेचा आज तिसरा दिवस असून स्वेरीच्या एफ.सी. केंद्रावर विद्यार्थी आणि पालकांची  प्रचंड गर्दी असल्याचे चित्र दिसत आहे. स्वेरी अभियांत्रिकीच्या प्लेसमेंट विभागाकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये सहाशे हून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. तसेच स्वेरीने संशोधन, सामंजस्य करार, शैक्षणिक निकाल, मानांकने याबाबतीत ही मोठी झेप घेतली आहे. 
            स्वेरीचे  संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार यांच्या सहकार्याने व प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा. करण पाटील यांच्या नेतृत्वाखाली उच्च शिक्षित प्राध्यापकांच्या अभ्यासपूर्ण सहकार्याने स्वेरीत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तसेच अचूक फॉर्म भरण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आलेली असून रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्धपणे सुरु आहे. स्वेरीत या प्रक्रियेला पालक व विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली आहे. स्वेरीच्या मार्गदर्शन कक्षात पालकांना संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची अचूक माहिती मिळत असून पालक व  विद्यार्थ्यांची स्वेरीत प्रचंड गर्दी असल्याचे दिसून ये आहे. एकीकडे स्वेरीने प्रवेश प्रक्रियेत व वार्षिक परीक्षेच्या निकालात मारलेली गरुड झेप तर दुसरीकडे स्वेरी अभियांत्रिकीला देशातील शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण असलेले ‘नॅक’ अर्थात ‘नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन कौन्सिल’चे ४ पैकी ३.४६ सीजीपीए सह ‘ए प्लस’ हे मानांकन, ए.आय.सी.टी.ई (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) व यु.जी.सी. (युनिव्हर्सिटी ग्रँटस कमिशन) यांच्याशी संलग्नित असणारे व ४ पैकी ३.४६ सीजीपीए सह नॅकचे ‘ए प्लस’ मानांकन मिळविणारे स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे सोलापूर विद्यापीठातील पहिले व एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे. स्वेरी अभियांत्रिकी मधील सर्व पात्र अभ्यासक्रमांना एन.बी.ए हे आंतरराष्ट्रीय मानांकन आहे. स्वेरीने प्लेसमेंट मध्येही  गरुड भरारी घेतली आहे. शै. वर्ष २०२२-२३ साठी प्रवेशाकरीता ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे, भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणी, अर्ज कायम करणे आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालक,  तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने अधिकृत केंद्र म्हणून मान्यता मिळाली असून पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रवेश प्रकियेचे मार्गदर्शन, संबधीत कागदपत्रे जमवाजमव करताना होणारी अडचण व आदी शंकाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले आहे. या केंद्रात  सोलापूर सोबतच पुणे, सातारा सांगली, अहमदनगर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यामधील विद्यार्थी देखील येवून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत आहेत. या रजिस्ट्रेशन प्रकियेची मुदत दि. २१ सप्टेंबर २०२२ पासून दि.०४ ऑक्टोबर २०२२ (सायं.४.०० वाजेपर्यंत) आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील (९५९५९२११५४), स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार (९५४५५५३८८८), प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.सतीश लेंडवे (९५४५५५३८७८) व प्रा. यु.एल.अनुसे (९१६८६५५३६५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. प्रवेश अर्ज भरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन आपला अर्ज भरावा व कन्फर्मेशन करून घ्यावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post