पंढरपूर सिंहगडच्या साक्षी उपलप ची ५ कंपनीत निवड
पंढरपूर: प्रतिनिधी
अभियांत्रिकीच्या शिक्षणात कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाने अल्पावधीतच सातत्यपूर्ण निकाल, प्लेसमेंटची दर्जेदार वाटचाल करून जिल्ह्यात अग्रस्थान पटकावले आहे. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल केलेल्या पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेत असलेल्या पंढरपूर येथील कुमारी साक्षी राहूल उपलप हिची कॅम्पस प्लेसमेंट मधुन सँकी सोल्युशन्स (वार्षिक पॅकेज ३ लाख), अँटाॅस सिंटेल (वार्षिक पॅकेज ३.४० लाख), हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज (वार्षिक पॅकेज ४ लाख), सीआरएम नेक्स्ट प्रा. लि. (वार्षिक पॅकेज ३ लाख) आणि रिलायन्स जिओ (वार्षिक पॅकेज ४ लाख) आदी ५ कंपनीत निवड झाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मधुन कुमारी साक्षी राहुल उपलाप हिने सँकी सोल्युशन्स, अँटाॅस सिंटेल, हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज, सीआरएम नेक्स्ट प्रा. लि. आणि रिलायन्स जिओ या नामांकित कंपनीत नोकरीसाठी मुलाखती दिल्या होत्या. या ५ हि कंपनीकडून कुमारी साक्षी राहूल उपलप हिची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली.
देशातील व परदेशातील नामांकित कंपन्यांना आवश्यक असलेले परफेक्ट इंजिनिअर हे पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये घडविले जातात. कंपनीला आवश्यक असलेले ज्ञान, गुण यांचा समन्वय साधून महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पद्धतीने शिक्षण व प्लेसमेंट ची तयारी करून घेतली जाते. यामुळेच पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील विद्यार्थी मुलाखती देण्यासाठी सक्षम होऊन यशस्वी होत आहेत.
काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेत असलेल्या कुमारी साक्षी उपलप हिला पाच हि कंपनीकडून नोकरीची संधी उपलब्ध असुन कुमारी साक्षी उपलाप हि अँटाॅस सिंटेल वार्षिक पॅकेज ३. ४० लाख मिळणाऱ्या कंपनीत नोकरी करणार असल्याचे तिने सांगितले.
विविध नामांकित कंपनीत निवड झालेल्या साक्षी उपलप हिचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. संदीप लिंगे, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.