किरण नवगिरे हिची भारतीय क्रिकेट संघात निवड
माळशिरस प्रतिनिधी :
तालुक्यातील मिरे येथील किरण नवगिरे हिची भारताच्या महिला क्रिकेट संघात इग्लंड दौऱ्यातील टी-२० सामन्यासाठी निवड झालेली आहे. अनघा देशपांडे नंतर भारतीय संघात स्थान मिळवणारी किरण सोलापुरची दुसरी खेळाडु आहे.
मिरे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या गावातील किरण प्रभू नवगिरे हिची पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या टी-20 सामन्यासाठी भारताच्या महिला क्रिकेट संघामध्ये निवड झाली आहे. खेडेगावातून व प्रतिकुल परिस्थितीतुन श्रीपुरच्या चंद्रशेखर विद्यालयात शिकत विविध क्रीडा स्पर्धा गाजवत पुढे पुणे विद्यापिठाच्या महिला क्रिकेट संघ, तसेच नागालँड, अरुणाचल प्रदेश कडुन खेळत सराव, सातत्य यातुन भारतीय महिला संघात स्थान मिळवले आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्या फलंदाजीने अनेक रेकॉर्ड केले आहेत
Tags
पंढरपूर घडामोडी