अनाथ मुलांना फ्री केक वाटणाऱ्या बेकरी मालकाची होतीये सोशल मीडिया वर कौतुक ।

अनाथ मुलांना फ्री केक वाटणाऱ्या बेकरी मालकाची होतीये सोशल मीडिया वर कौतुक । 

सध्या सोशल मीडियावर काही वेळातच अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. अनेकवेळा अशा काही गोष्टी आपण पाहतो आणि भावूक होतो. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कदाचित तुम्हीही त्यामुळे भावूक होऊ शकता.

एका बेकरी मालकाने एक फलक लावला आहे. या फलकावरील मजूकरामुळे त्या बेकरी मालकाने अनेकांचे मन जिंकले आहे. बऱ्याचजाणांनी हा फोटो सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे कमेंट्समध्ये म्हटले आहे. एका आयएएस ऑफिसरनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे बेकरी मालकाचे कौतुक होत आहे.

या फोटोत एक बेकरी दिसत आहे. यात बेकरीत मिळणारे केक, पेस्ट्री, कुकीज, कपकेक इत्यादी अधिक स्वादिष्ट पदार्थ दिसत आहेत. दरम्यान, या बेकरी मालकाने एक पोस्टर लावले आहे. त्यावर लिहलंय की, ज्यांना आई किंवा वडील नाहीत अशा सर्व 0 ते 14 वयोगटातील मुलांसाठी केक मोफत मिळणार आहे. मालकाच्या या निर्णयामुळे सोशल मिडीयावर त्याचे कौतुक होत आहे.


ज्या मुलांना आई, बाबा नाहीत त्यांना या मालकाने मोफत केक देण्याची ऑफर दिली आहे. ज्या मुलांचे आई आणि बाबा किंवा दोघेही नसतात त्यांचे आयुष्य सोपे नसते. उत्तर प्रदेशातील देवरिया येथील एका बेकरी मालकाने अशा मुलांना आनंद देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. दरम्यान, हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर कमेंट्सही येत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post