स्वेरीमध्ये 'हँडस-ऑन ट्रेनिंग युजिंग एनसिस्' या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग व एआरके इन्फोसोल्युशन्स प्रा. लि.च्या संयुक्त विद्यमाने ‘हँडस-ऑन ट्रेनिंग युजिंग एनसिस्’ ही दोन दिवसीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.
दि.२२ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट दरम्यान ही दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली. ‘जगभरातील तंत्रज्ञानाच्या बदलत्या प्रवाहानुसार आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग हा अद्ययावत असणे, ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी अशा प्राध्यापक विकास कार्यक्रमांची अत्यंत गरज असते.’ असे प्रतिपादन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी केले. इंजिनिअरिंग क्षेत्रातील प्रगतीसाठी व त्यातील संशोधनासाठी सिम्युलेशन अँड ऍनालिसिस करिता ‘एनसिस्’ या सॉफ्टवेअरचा वापर संशोधक व प्राध्यापक यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या विकास कार्यक्रमाचा उपयोग होणार आहे. सदर उपक्रमासाठी एआरके इन्फोसोल्युशन्स प्रा. लि. चे सिनियर ॲप्लिकेशन इंजिनिअर (एनसिस् - सीएफडी) रोहित संगवान या तज्ञांचे मार्गदर्शन लाभले. या दोन दिवसीय कार्यशाळेत एनसिस् सॉफ्टवेअर मधील सीएफडी, एफएसआय, स्ट्रक्चरल, व्हायब्रेशन, इत्यादी बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले. या विकास कार्यक्रमांमध्ये स्वेरी अभियांत्रिकी तसेच पदविका अभियांत्रिकी मधील मेकॅनिकल व सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापक वर्ग सहभागी झाले होते. या विकास कार्यक्रमाचे उदघाटन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, संस्थेचे युवा विश्वस्थ प्रा. सुरज रोंगे, कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, संशोधन अधिष्ठाता डॉ. रणजीत गिड्डे, प्लेसमेंट अँड कॉर्पोरेट अफेअर्स अधिष्ठाता प्रा.विक्रम चव्हाण आणि मेकॅनिकल इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर, डॉ. हर्षवर्धन रोंगे, प्रा.भास्कर गायकवाड, प्रा.संदीपराज साळुंखे, प्रा. सचिन खोमणे, प्रा.सचिन काळे, प्रा. अविनाश पारखे, प्रा. दिगंबर काशीद, प्रा. चंद्रकांत व्हरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. प्रा. चेतन जाधव यांनी या विकास कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.