राज्यस्थान व उत्तर प्रदेशातील घटनेच्या निषेधार्थ पंढरपुरात निघाला भव्य मोर्चा

Maharastra now 24
0
राज्यस्थान व उत्तर प्रदेशातील 2 शाळकरी मुलांच्या मृत्यूप्रकरणी त्या शिक्षकांना फाशी द्या

पंढरपुरात निघाला विविध सामाजिक संघटनांचा आक्रोश मोर्चा

प्रतिनिधी : पंढरपूर

एकीकडे भारत देश महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. भारताचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने देशामध्ये साजरा झाला पण या भारत देशामध्ये दलितांवरील अन्याय, अत्याचार जातीयवादी लोकांकडून बंद झालेले नाहीत व त्यावर कडक शासन झालेले नाही ही बाब देशासाठी निदंनीय व कलंकित करणारी आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन लहान मुलांवर अन्याय, अत्याचार झाल्यामुळे त्यांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे त्यामुळे संबंधित शिक्षकांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पंढरपूर गुजराती रूखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरू दोडिया व पंढरपूरातील सामाजिक संघटना यांनी पंढरपूरचे तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
सदर घटनेचा जाहीर निषेध करत पंढरपूर शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून पंढरपूर तहसिल कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यामध्ये विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सदरचे निवेदन शाळकरी मुलांच्याहस्ते देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना राजस्थान येथील झालोर जिल्ह्यातील सुराणा गावामधील सरस्वती विद्या मंदिर येथे इ.3री मध्ये शिकत असलेल्या 9 वर्षीय इंद्र मेघवाल या विद्यार्थ्याने तहान लागल्याने शिक्षकाच्या पिण्याच्या माठातील पाणी पिल्यामुळे त्या नराधम शिक्षक छेलसिंह याने त्या मुलाला बेदम मारहाण केल्याने त्याला उपचारासाठी गेले मात्र उपचारादरम्यान त्याचा जीव गेला आहे. तसेच  उत्तर प्रदेशमध्ये श्रावस्ती जिल्ह्यातील पं.ब्रह्मदत्त उ.मा.विद्यालय चौलाई सिरसा  या शाळेतील इ.3 रीमध्ये शिकणाऱ्या मुलाला शाळेची फी रू.250 भरण्यास उशीर झाल्याने शिक्षकाने त्या मुलाला क्रुरपणाने बेदम मारहाण केली त्यामध्ये त्या मुलाचा हात मोडला पण तो गंभीर जखमी झाला होता त्याचाही उपचारादरम्यान दुर्दैुवाने मृत्यू झालेला आहे.यादोन्ही घटना अमानवी कृत्याच्या असून या दोन्ही घटनेतील आरोपी शिक्षकांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व पिडीत कुटूंबियांना संरक्षण द्यावे. देशामध्ये कोणत्याही समाजावर अन्याय अत्याचार होवू नये म्हणून सरकारने तात्काळ दोन्ही आरोपींवर कडक कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा  पंढरपूर गुजराती रूखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था व पंढरपूरातील सामाजिक संघटनांनी दिलेला आहे.
या निवेदनाच्या प्रति देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब, सोलापूरचे जिल्हाधिकारी व पंढरपूरचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलेले आहे. 
यावेळी सकल चर्मकार समाज पंढरपूर शहरचे नितीन बनपूरकर, नगरसेवक राजू सर्वगोड,  नगरसेवक कृष्णा वाघमारे, महेश साठे, रिपाइं कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष सर्वगोड, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे युवक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल वाघमारे, महेश गोयल, काशिनाथ सोलंकी, बहुजन रयत परिषदेचे अध्यक्ष ऍड.किशोर खिलारे,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव अध्यक्ष शिलरत्न झेंडे, भिमज्योत तरूण मंडळाचे अध्यक्ष किशोर दंदाडे, रिपब्लिकन सेनेचे सागर गायकवाड, बाळासाहेब देवकर, शैलेश आगावणे, मुकेश गोयल, सुरेश सोलंकी, सतीश सोलंकी, राजन गोयल, कांतीलाल मेहडा, गंगाराम पुरबिया, माधव सोलंकी, अनिल गोयल, प्रमोद वाघेला, विजय वाघेला, रजनीश गोयल यांच्यासह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)