मुंबईत पुढील 3 दिवस मुसळधार। पुण्यातही अलर्ट लागू।

मुंबईत पुढिल 3 दिवस मुसळधार। पुण्यातही अलर्ट  लागू। 

मुंबईसह, ठाणे, कोकणामध्ये हवामान खात्याने हायअलर्ट जारी केला आहे. पुढील 3 दिवस मुंबई मुसळधार (mumbai) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच, पुण्यातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्याचा दिवस हा पावसासाठी फार महत्त्वाचा आहे.

कारण काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अलर्टनंतर प्रशासनही सतर्क झालं आहे. काही ठिकाणी खरंच नद्यांना पूर आल्यासारखी परिस्थिती आहे. पालघर जिल्ह्यासाठी 7 ऑगस्टसाठी येल्लो अलर्ट देण्यात आला होता.

पण त्यानंतर पुढच्या चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचाच अर्थ आतापासून पुढचे चार दिवस पालघर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आहे. आगामी चार दिवसांमध्ये पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे पालघर सारखाच येल्लो अलर्ट हा ठाणे आणि मुंबईसाठी देण्यात आला आहे.

त्यानंतर पुढचे चार दिवस हे ऑरेंज अलर्ट सांगण्यात आले आहेत. मुंबईसाठी फक्त 11 ऑगस्टला परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर कोकणात पाऊस प्रचंड धुमाकूळ घालत आहे. कोकणात तर तो धुवाँधार कोसळत आहे.

त्याचं हे कोसळणं आज आणि उद्या सारखंच असणार आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पाऊसही प्रचंड पडतोय. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात 9 ऑगस्टपासून ऑरेंज अलर्ट असणार आहे.

याचा अर्थ पावसाचं प्रमाण काहीसं कमी होईल. पण पाऊस कोसळत राहणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र थोडीसी परिस्थिती वेगळी असणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्यासाठी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर त्यापुढच्या तीन दिवसांसाठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
कोल्हापूर, पुण्यातही रेड अलर्ट पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यात आजसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. तर उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर पुढच्या तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे कोल्हापूरसाठी आजच्या दिवसासाठी रेड अलर्ट आणि पुढच्या दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सातारा जिल्ह्यासाठी आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर त्यापुढच्या तीन दिवसांसासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post