पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज पहा कोणत्या जिल्ह्यात असेल पावसाची बॅटिंग
Monsoon Update: भारतातील अनेक राज्यांत सध्या पावसाचा जोर बघायला मिळत आहे. मात्र असे असले तरी राज्यात धुमाकूळ घालत असलेला पाऊस गेल्या दोन-तीन दिवसांपासून कमालीचा ओसरला आहे.
राज्यातील ठराविक भाग वगळता गेल्या 48 तासापासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव बघायला मिळत आहेत. दरम्यान भारतीय हवामान विभागाने शेतकरी बांधवांची चिंता वाढवणारा अंदाज जाहीर केला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मते राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस राज्यातील अनेक जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांची काळजाची धडधड वाढली आहे. राज्यात दोन ते तीन दिवसांपूर्वी पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती बघायला मिळाली होती.
मात्र गेल्या दोन ते तीन दिवसात राज्यात पावसाची उसंत राहिली असल्याने शेतकरी बांधव समाधानी होते. पावसाची उघडीप असल्याने शेतकरी बांधवांना शेतीची कामे करता येत होती. मात्र, आता भारतीय हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा संकटाचा सामना करावा लागणार आहे.
दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपली एक ओळख निर्माण केलेल्या परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा देखील अंदाज आता सार्वजनिक झाला आहे. पंजाब राव यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज पासून राज्यात पुढील तीन दिवस पाऊस कायम राहणार आहे.
आज पासून म्हणजेच 23 जुलैपासून ते 25 जुलैपर्यंत राज्यातील अनेक विभागात मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या नवीनतम अंदाजानुसार, राज्यातील पूर्व विदर्भात, पश्चिम विदर्भात, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात तसेच कोकणातील काही जिल्ह्यात 25 जुलैपर्यंत पावसाची दाट शक्यता आहे.
या जिल्ह्यात होणारं पावसाची जोरदार बॅटिंगहवामान तज्ञ पंजाब रावांनी वर्तवलेल्या नवीन सुधारित अंदाजानुसार, नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव सोलापुर अहमदनगर अकोला अमरावती बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या जिल्ह्यात आज पासून ते 25 जुलै पर्यंत पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
दरम्यान पंजाबराव यांनी शेतकरी बांधवांना सल्ला देताना सांगितले की, शेतकरी बांधवांनी पावसाची उघडीप होताच फवारणीचे तसेच खते देण्याचे काम उरकून घ्यावे. पावसाची उघडीप राहिली तेव्हा शेतकरी बांधवांनी शेतीची कामे करून घ्यावी.
निश्चितच 25 जुलैपर्यंत पुन्हा एकदा राज्यात पाऊस राहणार असल्याने शेतकरी बांधवांना पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आधीच पावसामुळे पिकांची नासाडी झाली असल्याने 25 तारखेपर्यंत जर पाऊस कोसळत राहिला तर शेतकरी बांधवांच्या डोळ्यासमोर त्यांचे पिकं राख होण्याची शक्यता आहे. पंजाब रावांनी शेतकरी बांधवांना खरीप हंगामातील पिकांच्या चांगल्या वाढीसाठी आणि पावसामुळे प्रभावित झाली असल्याने फवारणी आणि खते लावण्याचा देखील सल्ला दिला आहे.