प्राप्त माहितीनुसार ST bus शनिवारी २३ जुलैला सकाळी ६ वाजताच्या सुमारास आईशर ट्रक क्रमांक MH 40 CD 7439 हा जाम कडून नागपूर कडे जात असता जाम जवळ हैद्राबाद ते नागपूर जाणारी बस क्रमाक TS 08 Z0224 चे चालकाने ट्रक ला मागून जबर धडक दिली यावेळी ट्रक रोडचे डावे भागाला खाली पलटी झाला, व बस रोडचे दुभाजकावर वर चढली, त्यामधे बस मधील १६ प्रवासी किरकोळ जखमी झाले.या अपघात ट्रक चे चालक व वाहक जखमी झाले, अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक सपाटे, पोलिस कर्मचारी किशोर येळणे, अजय बेले, गौरव खरवडे, सुनील श्रीनाथ, यांनी घटना स्थळ गाठून बस मधील प्रवाशांना बसचे बाहेर काढून उपचार करीता समुद्रपुर रुग्णालयामध्ये दाखल केले, अपघात ग्रस्त वाहन रोडचे बाजूला करून वाहतूक सुरळीत केली या संबंधी समुद्रपुर पोलिसात नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.
एस टी बस ची ट्रक ला मागून धडक। 16 प्रवाशी किरकोळ जखमी
Saturday, July 23, 2022
0
नागपूर ST bus हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील जाम जवळ एसटी बसने ट्रकला मागून जबर धडक दिली या अपघात बस मधिल १८ प्रवासी किरकोळ जखमी झाले तरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
