पंढरपूर सिंहगड मध्ये "इलेक्ट्रीक व्हेईकल" कार्यशाळा
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी "इलेक्ट्रीक व्हेईकल" या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यशाळेचे उद्घाटन काॅलेजचे उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, प्रा. धनंजय गिराम, प्रमुख पाहुणे उद्योजक सुरज डोके आदींच्या हस्ते करण्यात आले.
यादरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उद्योजक सुरज डोके म्हणाले, पारंपरिक ऊर्जास्त्रोत आणि त्याची कमतरता यावर मात करण्यासाठी "इलेक्ट्रीक व्हेईकल्स" वापरण्याची गरज आहे. पारंपरिक सौरऊर्जेचा वापर करणे आज काळाची गरज निर्माण झाली आहे. बॅटरीज सिस्टम, विविध प्रकारच्या मोटर्स, बीएलडीसी मोटर्स अँड सेन्सर्स याविषयावर मार्गदर्शन माहिती इंजिनिअर सुरज डोके यांनी यादरम्यान विद्यार्थ्यांना दिली.
हि कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रसाद कुलकर्णी, प्रा. सोमनाथ कोळी, अभिषेक गोडसे, विजय नवले आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.