पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांची माहिती
पंढरपूर:
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पंढरपूर रोटरी क्लब व एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांच्या संयुक्त विद्यमानाने ५ जुन या दिवशी नमामी चंद्रभागा नदी जाऊ स्वच्छता करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोटरी क्लब पंढरपूर व सिंहगड कॉलेज च्या माध्यमातून सिंहगडच्या काॅलेजच्या ८० हून अधिक विद्यार्थ्यांनी चंद्रभागा नदी, वाळवंटात जाऊन तेथील कचरा, प्लॅस्टिक कागद व इतर कचरा गोळा करून त्यांची योग्य विल्हेवाट करण्यात आली.
पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी सिंहगड काॅलेज मधील राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. अतुल आराध्ये, प्रा. अजित करांडे, प्रा. सिद्धेश्वर गणगोंडा, प्रा. अर्जुन मासाळ आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.
सिंहगड काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी नदीपाञातील जाऊन स्वच्छता करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केल्याने सर्वञ त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.