पंढरपूर सिंहगडच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागात पालक मेळावा उत्साहात

0
पंढरपूर सिंहगडच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागात पालक मेळावा उत्साहात

पंढरपूर: प्रतिनिधी

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये दिनांक ४ जून २०२२ रोजी सिव्हिल इंजिनिअरींग विभागाचा पालक मेळावा प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. हा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या पालक मेळाव्याचे उद्घाटन उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्रीगणेश कदम, प्रा. यशवंत पवार, प्रा. चंद्रकांत देशमुख, पालक प्रतिनिधी संजय पांडे आदीच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या मेळाव्यास उपस्थित मान्यवरांचे व पालक प्रतिनिधी म्हणून लाभलेले संजय पांडे यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी विभागातील शैक्षणिक आढावा प्रेझेन्टेशन द्वारे उपस्थित पालकांसमोर सादर केला. यामध्ये विभागामधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक निकाल, प्लेसमेंटची माहिती, समुह चर्चा व विभागात आयोजीत करण्यात येणाऱ्या इतर उपक्रमांसह अनेक विषयांवर महत्त्वपूर्ण माहिती पालकांना दिली.
दरम्यान काॅलेजचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी आता ऑफलाईन परीक्षांसाठी तयार राहील पाहिजे, यासाठी त्यांनी कॉलेजमध्ये शिकविले जाते तेवढाच जरी व्यवस्थित अभ्यास केला तरी त्यांना निश्चित यश भेटेल. विभागातील अनेक विद्यार्थी नामांकित कंपनीत निवडले असल्याचे विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी बोलताना व्यक्त केले.
या मेळाव्यात शैक्षणिक वर्षांतील विद्यापीठ परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व नामांकित कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. यशवंत पवार यांनी केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !