पंढरपूर सिंहगडच्या ५०० हून अधिक विद्यार्थ्यांकडून योग दिवस साजरा
पंढरपूर:
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी पंढरपूर येथील रेल्वे ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आलेल्या "योग दिवस" निमित्त ऐतिहासिक योग दिवस साजरा झाला. या ऐतिहासिक योग दिवसानिमित पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील ५०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन योग दिवस साजरा केला असल्याची माहिती काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
२१ जुन हा आंतरराष्ट्रीय योग दिवस संपुर्ण महाराष्ट्रात योग दिवस साजरा केला जातोय. याच अनुषंगाने एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग काॅलेज मधील ५०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी यांनी भारत सरकार आयुष मंत्रालय यांच्याकडून योग दिवस साजरा करण्याबाबत सुचना करण्यात आली होती.
पंढरपूर येथील रेल्वे ग्राऊंड येथे २१ जुन रोजी रोजी सकाळी ६ ते ८ या कालावधीत खुप मोठ्या प्रमाणात नागरिकांनी योग दिवस साजरा करण्यासाठी हजेरी लावली. यामध्ये एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या माध्यमातून योग दिवस साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.