पंढरपूर सिंहगडच्या काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात पालक मेळावा उत्साहात संपन्न
पंढरपूर:
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये गुरुवार दिनांक २३ जुन २०२२ रोजी काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या पालक मेळाव्याचे उद्घाटन पालक प्रतिनिधी प्रा. प्रकाश माळी, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, विभाग प्रमुख प्रा. नामदेव सावंत, प्रा. सुमित इंगोले आदींच्या हस्ते सरस्वती पुजन करून दीपप्रज्वलनाने पालक मेळाव्याची सुरवात करण्यात आली.
सिंहगड काॅलेजच्या वतीने पालक प्रतिनिधी प्रा. प्रकाश माळी यांचे स्वागत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
या मेळाव्यात पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख नामदेव सावंत म्हणाले, काॅलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. याशिवाय काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागाचा निकाल पहिल्या दहा क्रमांकांमध्ये सिंहगडचे सहा विद्यार्थी आहेत. विभागातील विद्यार्थ्यांचे नामांकित कंपनीत व इंडस्ट्रीज मध्ये आवश्यक असणारे सर्व ट्रेनिंग काॅलेज च्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत. प्लेसमेंट च्या माध्यमातून यावर्षी अनेक विद्यार्थ्यांकडून २०० हून अधिक कंपन्या काॅलेज मध्ये येऊन गेल्याने अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजची नोकऱ्या मिळाल्या आहेत. काॅलेजला अनेक नामांकन मिळालेले असल्याचे मनोगत प्रा. नामदेव सावंत यांनी व्यक्त केले.
पालक प्रतिनिधी प्रा. प्रकाश माळी बोलताना म्हणाले, सिंहगड काॅलेज मध्ये शैक्षणिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. सिंहगड कॉलेज बद्दल गैरसमज पसरवले जातात. त्याबाबत मी काॅलेज मध्ये चौकशी करून माहिती घेऊन प्रवेश निश्चित केला अन् माझ्या पाल्याची खुप चांगली प्रगती झाली असुन काॅलेज मधील शिक्षक विद्यार्थ्यांना खुप अप्रतिम शिक्षण देत असल्याचे मत प्रा. प्रकाश माळी यांनी व्यक्त केले.
काॅलेजचे प्राचार्य मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी कष्ट करण्याची तयारी ठेवली तर निश्चितच यशाचे शिखर गाठता येते. अनेक विद्यार्थी व पालक काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग ब्रँच मागणी असते परंतु इतर ब्रँच मध्ये शिक्षण घेत असलेले अनेक विद्यार्थ्यांची आयटी कंपन्यात निवड झाली आहे. नोकरी बरोबरच उद्योग क्षेत्रातही करीअर करण्याची संधीचा विचार विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक असल्याचे मत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे बोलताना व्यक्त केले.
या मेळाव्यात यशस्वी विद्यार्थ्यांचे सन्मानपत्र व गुलाब फुल देऊन सन्मान करण्यात आला.
या मेळाव्याचे सुञसंचलन प्रा. सुमित इंगोले यांनी तर आभार प्रा. सार्थक होरा यांनी मानले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.