विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे- अभिषेक धामणकर
पंढरपूर: महाराष्ट्र Now 24
अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना आईवडिलांना सुखी करण्याचं स्वप्न बघून ते स्वप्न पुर्ण करण्यासाठी आत्मविश्वासाने सामोरे जाणे आवश्यक आहे. आत्ता कृतिशील बना अथवा नंतर निराश व्हा या तत्वाने विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे असे मत अभिषेक धामणकर यांनी पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात व्याख्यानात बोलताना व्यक्त केले.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी "सिव्हिल इंजिनिअरींग मध्ये सरकारी नोकरीची संधी" या विषयावर अभिषेक धामणकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान उत्साहात संपन्न झाले.
या व्याख्यानाची सुरुवात विद्येचे आराध्य दैवत सरस्वती पूजन उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, अभिषेक धामणकर, डाॅ. श्रीगणेश कदम, प्रा. यशवंत पवार आदी मान्यवर हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले.
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या व सिव्हिल इंजिनिअरींग विभागाच्या वतीने उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते अभिषेक धामणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
हे व्याख्यान द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सिव्हिल इंजिनीअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनीअरिंग स्टुडंट्स असोसिएशन च्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कुमारी प्रियांका चव्हाण व धनश्री निकम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. यशवंत पवार यांनी मानले.