स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावरील 'गेट' परीक्षेमध्ये उज्वल यश

0
स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावरील 'गेट' परीक्षेमध्ये उज्वल यश

पंढरपूर– तंत्रशिक्षणामध्ये  सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील 'गेट' (ग्रॅज्युएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग) या परीक्षेमध्ये गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ  इंजिनिअरिंगच्या सहा विद्यार्थ्यांनी नुकतेच उज्वल यश संपादन केले आहे. 
        राष्ट्रीय स्तरावरील ‘गेट’ या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत आणि आय.आय.एस.सी. आणि आय.आय.टी. या उच्च तंत्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेमध्ये स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. ही परीक्षा अत्यंत अवघड स्वरुपाची असून या परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची आणि उच्च करिअरची दारे खुली होत असतात. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांचे विद्यार्थ्यांसाठीचे विकासात्मक धोरण, नियोजनात्मक मार्गदर्शन आणि उच्च शिक्षित प्राध्यापकांच्या  सहकार्याने स्वेरीत 'गेट' परीक्षेची तयार करून घेतली जाते. यामध्ये प्रत्येक वर्षी विविध विषयांचे मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातात. या व्यतिरिक्त ‘ॲडव्हान्सड टेक्निकल ट्रेनिंग’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अशा परीक्षांसाठी लागणारी संपूर्ण तयारी करून घेतली जाते. वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या टेस्टस आणि त्यांचे विश्लेषण यामधून विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणातील अद्ययावत माहिती मिळते. त्यामुळे स्वेरीतील विद्यार्थी घवघवीत यश मिळवित आहेत. या परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारे सर्व स्टडी मटेरियल हे स्वेरीच्या लायब्ररीमधून उपलब्ध करून दिले जाते. तसेच 'गेट ट्यूटर' या ऑनलाइन प्लॅटफॉर्म च्या  माध्यमातून विद्यार्थ्यांना 'गेट' संदर्भात अधिक माहिती मिळून परीक्षेच्या दृष्टीने सखोल तयारी करण्यास मदत मिळते. 'गेट-२०२२' या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेमध्ये तेजश्री भारत लेंडवे, मोनाली अरुण नागटिळक, आर्वी राजेश कवडे, मंदार जिवाजी मिसाळ, प्रितीश बाबू ऐवळे आणि स्वप्नील सुधीर काकडे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. गेट ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आय.आय.टी, एन.आय.टी. सारख्या संस्थांमध्ये प्रवेश मिळतो. त्याबरोबरच या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘पब्लिक सेक्टर मधील कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या आणि उच्चपदाच्या नोकरीसाठी संधी मिळतात. पुढील वर्षी असणाऱ्या गेट २०२३ परीक्षेसाठी देखील महाविद्यालयामार्फत विशेष प्रशिक्षण आणि मार्गदर्शन सुरू करण्यात आलेले आहे. स्वेरीचे अभियांत्रिकी महाविद्यालय हे वार्षिक परीक्षांचे निकाल, प्लेसमेंट या महत्वाच्या बाबीमध्ये कायम अग्रेसर राहिलेले आहे. गेट परीक्षेत उज्वल यश मिळवलेल्या या सहाही विद्यार्थ्यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले यांच्यासह इतर विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज, स्वेरी अंतर्गत असणाऱ्या डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, बी. फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांच्यासह अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !