*पंढरपूर सिंहगडच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात व्याख्यान संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस. के. एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात बुधवार दिनांक २३ मार्च २०२२ रोजी "क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्स अँड पेटेन्ट फायलिंग" याविषयावर डाॅ. भालचंद्र केळकर व डाॅ. सुहासराव खांबे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
या व्याख्यानाचे प्रास्ताविक डाॅ. बाळासाहेब गंधारे यांनी केले तर मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी डाॅ. भालचंद्र केळकर व डाॅ. सुहास खांबे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
प्रा. डाॅ. भालचंद्र केळकर बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी सोप्यापद्धतीने आडीयामधुन इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्स कसे साकारले जाऊ शकतात. त्यामधून समाजातील समस्या सोडविल्या जाऊ शकतात. याबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
प्रा. सुहास खांबे यांनी पेटंट म्हणजे काय? कोण-कोणत्या विविध प्राॅडक्ट व प्रक्रिया यांना पेटंट मिळते. याशिवाय पेटंट मुळे विद्यार्थ्यांना काय फायदा होऊ शकतो. या बद्दल माहिती दिली.
हे व्याख्यान मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील तृतीय व चतुर्थ वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी प्रा. धनंजय गिराम सह मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग परिश्रम घेत आहेत.