आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळामार्फत प्रलंबित अर्जांची कार्यवाही व डाळिंबउत्पादक यांना नुकसानभरपाई द्यावी - आ. समाधान आवताडे यांची मागणी

0
आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळामार्फत प्रलंबित अर्जांची कार्यवाही व डाळिंबउत्पादक यांना नुकसानभरपाई द्यावी - आ. समाधान आवताडे यांची मागणी 
पंढरपूर( प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्याच्या ऐतिहासिक जडणघडणीमध्ये परिपूर्ण योगदान देणारा समाज म्हणून मराठा समाजाचे अग्रक्रमाने नाव घेतले जाते. कोणत्याही समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि सक्षमतेसाठी त्या समाजातील प्रत्येक घटकास अर्थिकदृष्ट्या साक्षर करणे गरजेचे आहे. मराठा समाज हा बारा बलुतेदार आणि अठरापगड जातीतील लोकांना सामावून घेत सर्वांगीण विकासासाठी आपले योगदान देणारा समाज आहे असे गृहीतक मानले जाते. आरक्षण व शैक्षणिक क्षेत्रातील कमी झालेल्या नोकरीच्या संधी यांच्या कात्रीमध्ये सापडलेल्या मराठा समाजाला व्यावसायात सक्षम करण्यासाठी आण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळामार्फत १० लाख पर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्याची प्रक्रिया अनेक दिवसांपासून रखडली गेली असल्यामुळे सदर योजनेसंदर्भातील अनेक प्रलंबित आहेत त्याची कार्यवाही सुरु करावी अशी मागणी पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे.मराठा समाजातील बेरोजगार आणि व्यावसायिक वृत्तीच्या नवउद्योजक तरुणांना आण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास
महामंडळामार्फत १० लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची योजना आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती व्यवसायाची यशस्वी परंपरा जतन करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंत्राच्या सहाय्याने आधुनिक शेतीची कास धरली आहे. तंत्रज्ञान पूरक शेती व्यवसाय करण्यासाठी कृषी व्यवसायाच्या श्रेणीत असलेले ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज देण्याचे बंद केले आहे. परंतु मराठा समाजातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महामंडळाच्या जाचक अटी रद्द करून त्यांना हवा तो व्यवसाय करण्यासाठी कर्ज देण्यात यावे आणि आत्तापर्यंत प्रलंबित असलेले कर्जाचे अर्ज निकाली काढावे अशी मागणी आ. समाधान आवताडे यांनी चालू अर्थसांकल्पीय अधिवेशनात कपात सूचना प्रश्न अनुषंगाने केली आहे.त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील कायम दुष्काळीपट्टा अशी ओळख असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील ५०० हजार हेक्टर व पंढरपूर तालुक्यातील १२००० हजार हेक्टर असे एकूण १७००० हजार हेक्टर क्षेत्रामध्ये डाळिंब फळाची लागवड होते. परंतु मागील दोन वर्षांपासून मंगळवेढा व पंढरपूर या दोन्ही तालुक्यामध्ये डाळिंब फळावर पडणाऱ्या खोडकिडी या रोगाने उच्छाद मांडल्यामुळे डाळिंबउत्पादक शेतकरी कोलमडून गेला आहे. सदरच्या रोगाची तीव्रता इतकी आहे की, अक्षरशः झाडे जळून बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या रोगामुळे आणि होणाऱ्या प्रचंड नुकसानामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. व त्यांच्यापुढे अर्थिक नुकसानीचे खूप मोठे संकट उभा राहीले आहे.डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या या समस्या अनुषंगाने योग्य ती उपाययोजना करून शासनाने पंढरपूर व मंगळवेढा येथील स्थानिक शेतकऱ्यांना आवश्यक ती अर्थिक नुकसानभरपाई त्वरित उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आ. समाधान आवताडे यांनी विधिमंडळ सभागृहामध्ये केल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थिक मदतीच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !