*ओबीसींच्या जनगणनेचा विषय गंभीर- प्रा. श्रावण देवरे*
सांगोला येथे "ओबीसी जनगणना आवश्यकता व ती का केली जात नाही? याविषयावर व्याख्यान संपन्न
सांगोला: प्रतिनिधी
संपुर्ण भारताची जनगणना १७७२ साली इंग्रजांच्या काळात जनगणना करण्यात आली. ओबीसीची जनगणना होणे खुप आवश्यक आहे. जनगणनेच्या आकडेवारीनुसार सरकार उपाय योजना करत असते. १९३१ साली इंग्रजाच्या काळातील शेवटची जनगणना झाली. १९५१ साली सुरू झालेली जनगणना हि ओबीसी शिवाय सुरू करण्यात आली. त्यानंतर आजतागायत ती सुरू झाली नाही.
प्लॅनिंग कमिशनच्या माध्यमातून जनगणनेनुसार सरकारी योजनेतून वाटप करण्यात येत असतात. ओबीसीची आकडेवारी सरकारकडे नसल्याने सरकारी योजनेपासून ओबीसी वंचित आहे. २००१ साली ओबीसीची जनगणना करण्यासाठी तात्कालिन प्रधानमंञी देवेगौडा यांनी ठराव पास केला. परंतु तो ठराव रद्द करण्यात आला. ओबीसींच्या जनगणनेचा विषय गंभीर आहे. ओबीसीची जनगणना नसल्याने पैसा खर्च होत नाही. ओबीसी जनगणना करण्यासाठी फक्त आंदोलन करून उपयोग नाही तर निवडणूक मुख्य विषय आहे. ओबीसी बांधवांनी घरात बसून आंदोलन करू शकता. स्वतःच्या घराच्या मुख्य दरवाज्याच्यावरती असा फलक लावावा की मा. जनगणना अधिकारी साहेब आपल्याकडे जनगणनचा जो फाॅर्म आहे त्यामध्ये ओबीसी काॅलम नसेल तर आपणास या घरातील कोणती माहिती दिली जाणार नाही. असा फलक लावल्यास त्या फाॅर्म च्या खाली शेरा (रिमार्क) या काॅलम मधील आपल्या फलकची माहिती बहिष्कार रूपी केंद्र शासनाकडे जाईल. मगच ओबीसीची जनगणना होईल असा विश्वास प्रा. श्रावण देवरे यांनी बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावता पुसावळे बोलताना म्हणाले, ओबीसी आरक्षण काळाची गरज आहे. ओबीसी मधील सर्व जातींनी एकञ येणे आवश्यक आहे. राजकारण न करताना ओबीसींच्या जनगणनेसाठी एकञ आले पाहिजे. ओबीसी बांधवांनी जनगणना आपण स्वतःच करणे आवश्यक आहे. तरूणांना जागृत करणे खुप महत्वाचे असल्याचे मत सावता पुसावळे यांनी मनोगत व्यक्त करताना व्यक्त केले.
या व्याख्यानाची सुरुवात महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. व्याख्याते श्रावण देवरे यांचा सप्त्निक तसेच प्रमुख पाहुणे सावता पुसावळे यांचे पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या व्याख्यान प्रसंगी सांगोला अर्बन को-ऑपरेटिव बँकचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. प्रभाकर माळी, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तुकाराम कुदळे, माजी उपनगराध्यक्ष सुरेश माळी, माजी नगरसेवक गजानन बनकर, अँड. भारत बनकर, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ राऊत, प्रा. जयंत भंडारे, प्रा. ढोणे, प्रा. हणमंत आदलिंगे, रामचंद्र जाधव, प्रा. भिमराव राऊत, मधुकर माळी, गणेश माळी, रोटरी अध्यक्ष विजय म्हेञे, बापु ठोकळे, प्रा. बिराप्पा मोटे, हरीभाऊ पाटील, समता परिषद सांगोला भैरवनाथ बुरांडे, साधु गोडसे, लक्ष्मण माळी, किशोर बनसोडे, नेहल तांबोळी, आबासाहेब शेजाळ, अरविंद येलपले, गोविंद माळी, दिपक वाघमोडे, आनंद राऊत, प्रा. ज्ञानेश्वर माळी, प्रा.मयुरी राऊत, शहाजी गडहिरे, विशाल म्हेञे, इंजिनिअर गोडसे आदींसह अनेक ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोमनाथ राऊत यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. प्रभाकर माळी यांनी मानले.