*सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये इसेन्स ऑफ सक्सेसफुल बिझनेस मोडेल या विषयावर वेबिनार संपन्न*
पंढरपूर : प्रतिनिधी
कोर्टी ( ता. पंढरपूर ) येथील एस. के .एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग महाविद्यालयात दिनांक १६ मार्च रोजी ऑनलाइन वेबिनार आयोजन केले होते. हा वेबिनार मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
हा वेबिनार इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल व इंटरप्रिन्युअर डेवलपमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला होता. वेबिनार सुरुवात डॉ. बाळासाहेब गंधारे यांनी केली व प्राचार्य. डॉ कैलाश करांडे यांनी वेबिनार बद्दलचे आपले विचार व्यक्त केले व यावेबिनार चे महत्व सर्वांना सांगितले. त्यानंतर इसेन्सऑफ सक्सेसफुल बिझनेस मोडेल या विषयावर या विषयावर डॉ. परमासिवम वेल्लाळ यांनी मार्गदर्शन केले व त्यांनी टाटा, पतंजली यांसारख्या सक्सेसफुल बिझनेस मोडेल बद्दल महत्वपूर्ण माहिती दीली, या माहितीचा विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये खूप चांगला फायदा होईल.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी
आभार प्रदर्शनव प्रा. राहूल शिंदे कार्यक्रमाचे समन्वयक तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून आभार प्रदर्शन केले. हा वेबीनार यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील प्रा.गणेश बिराजदार, प्रा. विक्रम भाकरे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सध्या कोरोना संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन प्रगतीसाठी ऑनलाइन पद्धतीने असे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रेरणा देत आहे या वेबिणार मध्ये १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.