भिमा सहकारी साखर कारखाना चे चेअरमन धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक यांनी केले आर्थिक मदत
पंढरपूर( प्रतिनिधी)टाकळी सिकंदर येथील भीमा सह साखर कारखान्याच्या मॉलसीस टाकीचा स्फोट होऊन एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, पण कार्यतत्पर आणि सहानुभूती असणारे सहर्दयी चेअरमन श्री धनंजय महाडिक यांनी त्वरित तीन लाख रुपयांची मदत केली तसेच मयत कामगाराच्या मुलास नोकरी देण्याचे वचन त्यांनी दिले.
भिमा सह. साखर कारखान्यावर मोलॅशिस टाकीचा स्फोट होऊन औंढी येथील भिमा परिवाराचा एक निष्ठावंत कामगार, कार्यकर्ता मरण पावला.त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होऊन त्या कुटूंबाला आधार देण्याचं काम भिमा परिवाराचे सर्वेसर्वा व कारखान्याचे चेअरमन माजी खासदार धनंजय महाडीक व कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश (आण्णा) जगताप व संचालक मंडळ कार्यकर्ते मयत कामगाराच्या मुलास कायम नोकरीची वर्क ऑर्डर व रोख रू. ३ लाख चा धनादेश यांनी दिला. चेअरमन महाडिक यांनी तातडीने केलेली मदत व आस्था पाहून मोहोळ परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.