पंढरपूर : (दि.२७)-कविवर्य वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस येथील राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपूर येथील नवीन आगारात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अद्यापक विद्यालयाचे प्रा. धनंजय पंधे , कवी रवि सोनार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर यावेळी भारत शिंदे, राजेंद्र शहापूरकर, कबीर देवकूळे, सचिन कुलकर्णी, आगार व्यवस्थापक सुधीर सुतार, स्थानक प्रमूख रत्नाकर लाड, कार्यशाळा अधिक्षक घोलप, वाहतूक निरीक्षक पंकज तोंडे, होनराव यांचय उपस्थित कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी मराठी भाषा टिकली पाहीजे. जगली पाहिजे असे सुधीर सुतार म्हणाले. तर याप्रसंगी कवी रवि सोनार, प्रा. धनंजय पंधे यांनी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे वाचन केले. तर यावेळी प्रवाशांना आगाराकडून साखर व पेढे वाटप करण्यात आले. प्रवाशांना 51 पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी आगारात लक्षवेधी रांगोळी काढण्यात आली होती तर फलाटावर नारळाच्या झावळ्यांची कमान तयार करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोहन शिंदे यांनी केले तर आभार रत्नाकर लाड यांनी मानले.