स्वेरीला ए.आय.सी.टी.ई. कडून ‘बँड एक्सलन्ट’ हा बहुमान

0

पंढरपूर- केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत घेतल्या जाणाऱ्या ‘आरीया’ अर्थात ‘अटल रँकिंग फॉर इनोव्हेशन अचिव्हमेंट’ या उपक्रमांतर्गत ए.आय.सी.टी.ई तथा ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन कडून गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ‘बँड एक्सलन्ट’ हा बहुमान नुकताच प्राप्त झाला आहे.

 स्वेरी अभियांत्रिकीची स्थापना १९९८ साली झाली. तेंव्हापासून शैक्षणिक क्षेत्रात विकासात्मक दृष्टीकोन ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला गती देत  असतानाच महाविद्यालयाने अनेक मानांकने मिळवली. त्यात आता ‘बँड एक्सलन्ट’ हा बहुमान मिळाल्याने स्वेरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. काही महिन्यांपूर्वी स्वेरीला संशोधन क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम केल्याबद्दल ए. आय. सी. टी.ई कडून देशातील सर्वात जास्त असणारे चार स्टार रेटींग प्राप्त झाले होते. ‘अटल रँकिंग फॉर इनोव्हेशन अचिव्हमेंट’ या उपक्रमात देशभरातील १४३८ शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी फक्त ९६ संस्थांना त्यांच्या नवकल्पना व उदयोजकीय परिसंस्था निर्माण केल्याबद्दल ए. आय. सी. टी.ई. कडून ‘बँड एक्सलन्ट’ हा बहुमान देण्यात आला आहे. हा बहुमान मिळविणारे स्वेरी अभियांत्रिकी हे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय आहे. यामुळे महाविद्यालयामध्ये इनोव्हेटिव इकोसिस्टिम विकसित करण्यास मोठी चालना मिळाली आहे. यापूर्वी स्वेरी अभियांत्रिकीला राष्ट्रीय पातळीवरील नॅक, एन.बी.ए., टी.सी.एस., आय.ई.आय., आय.एस.ओ. ९००१:२०१५ ही मानांकने मिळालेली आहेत. ‘आरीया’ या उपक्रमांतर्गत ‘बँड एक्सलन्ट’ हा बहुमान देताना अनेक आवश्यक बाबी पाहिल्या जातात.  महाविद्यालयाने किती पेटंटस फाईल केले ?, किती पेटंटस  ग्रँट झाले?, स्टार्टअप साठीचे किती उपक्रम राबवले गेले?, महाविद्यालयामध्ये इन्क्यूबेशन, प्री- इन्क्यूबेशन, इनोव्हेटिव आयडीया सेंटर उभी आहेत की नाही? या बाबी अधिक विचारात घेतल्या जातात, त्यानंतरच हा बहुमान मिळतो. स्वेरीने या बाबी पूर्ण केल्यामुळेच हा बहुमान मिळाला आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार यांच्या सहकार्याने इनोव्हेशन सेलच्या स्वेरीच्या समन्वयक डॉ. विद्याराणी क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले. यासाठी स्वेरीतील अधिष्ठाता, विभागप्रमुख यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सहकार्य केले. ‘बँड एक्सलन्ट’ बहुमान मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले, स्वेरीचे सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !