माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि जयसिंह मोहिते पाटील यांनी केली हायजाक.
अकलूज प्रतिनिधी — अकलूज नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात खळबळ निर्माण करणारी तक्रार राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे सरचिटणीस मोहित बालासाहेब गायकवाड यांनी पोलिसांकडे दाखल केली आहे. 11 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांना बंद खोलीत गंभीर स्वरूपाची धमकी देण्यात आल्याचा आणि उमेदवारी रोखण्यासाठी संगनमत करण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
गायकवाड यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, ते शिवरत्न बंगला, अकलूज येथे नगरपरिषद निवडणूक मुलाखतीसाठी गेले असता त्यांना बंद खोलीत मुलाखत वेळी ‘शेटे हॉस्पिटलमधील डॉक्टर प्रकरण तात्काळ मिटवून टाका’ असा दबाव आणल्याचा आरोप केला आहे. त्या वेळी घरात इतर व्यक्ती उपस्थित होत्या, परंतु त्यांनी हस्तक्षेप केला नसल्याचे म्हटले आहे.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, बैठकदरम्यान “हे प्रकरण मिटले नाही तर तुझे काही खरे नाही, तुला उमेदवारी मिळणार नाही, तुला पक्षातून काढून टाकू” अशा धमक्या देण्यात आल्या. या विधानांमुळे त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उमेदवारी रोखण्यासाठी संगनमताचेही आरोप
गायकवाड यांनी दिलेल्या दुसऱ्या पत्रानुसार, भाजप आमदार रणजितसिंह,बाळदादा मोहिते पाटील व खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या संगनमताने त्यांची उमेदवारी मुद्दाम डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कारण पहिल्या मुलाखतीच्या वेळेस भाजपचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील ही उपस्थित होते. उमेदवारी प्रक्रियेत पक्षातील स्थानिक गटांनी दबाव आणून त्यांना बाहेर ठेवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रतिशोधात्मक कारवाईची भीती
तक्रारीत गायकवाड यांनी नमूद केले आहे की, या प्रकरणात त्यांनी आवाज उठवल्यामुळे त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे लावले जाऊ शकतात, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
घटनेनंतर मानसिक तणावामुळे काही दिवस तक्रार दाखल करता आली नाही, परंतु सुरक्षा धोक्यामुळे अखेर त्यांनी तक्रार नोंदवली.
प्रशासनाकडून या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
