Pandharpur panchayat samiti | पंढरपूर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५: आरक्षण जाहीर

 पंढरपूर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५: आरक्षण जाहीर

प्रतिनिधी : 

पंढरपूर पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारी संदर्भात एक मोठी आणि निर्णायक बातमी समोर आली आहे. बहुप्रतिक्षित १६ पंचायत समिती गटाचे आरक्षण अखेर आज जाहीर झाले आहे. या आरक्षणामुळे स्थानिक राजकारणात आता खऱ्या अर्थाने हालचालींना वेग येणार आहे.

पंढरपूर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५: आरक्षण जाहीर

पंढरपूर पंचायत समितीच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आरक्षणाची सोडत काढण्यात आली. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम आणि सुधारित नियमांनुसार १६ गटाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. अनेक इच्छुकांच्या नजरा या आरक्षणावर लागल्या होत्या, आणि आता जाहीर झालेल्या या तक्त्यामुळे अनेकांची राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

आरक्षणानुसार १६ पंचायत समिती गणांची स्थिती खालीलप्रमाणे आहे


१. ५७-उंबरे सर्वसाधारण (खुला)

२. ५८-करकंब सर्वसाधारण (खुला)

३. ५९- भोसे नामाप्र महिला (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग - महिला)

४. ६०-गुरसाळे सर्वसाधारण (खुला)

५. ६१-रोपळे सर्वसाधारण महिला

६. ६२-सुस्ते अनुसूचित जाती महिला

७. ६३-पुळूज नामाप्र महिला (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग - महिला)

८. ६४-गोपाळपूर सर्वसाधारण महिला

९. ६५-वाखरी नामाप्र (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग - खुला)

१०. ६६-पटवर्धन कुरोली सर्वसाधारण महिला

११. ६७-भाळवणी नामाप्र (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग - खुला)

१२. ६८-पळशी अनुसूचित जाती महिला

१३. ६९-टाकळी सर्वसाधारण (खुला)

१४. ७०-खर्डी अनुसूचित जाती (खुला)

१५. ७१-कासेगाव सर्वसाधारण (खुला)

१६. ७२-सरकोली सर्वसाधारण महिला

सर्वसाधारण (खुला) गट: एकूण ५ गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले आहेत, यात उंबरे, करकंब, गुरसाळे, टाकळी आणि कासेगाव यांचा समावेश आहे. या गटा मध्ये कोणत्याही प्रवर्गातील व्यक्ती निवडणूक लढवू शकतील.

​सर्वसाधारण महिला गट: रोपळे, गोपाळपूर, पटवर्धन कुरोली आणि सरकोली असे एकूण ४ गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.

​नामाप्र (OBC) प्रवर्ग: नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी एकूण ४ जागा आरक्षित झाल्या आहेत. यात भोसे आणि पुळूज हे नामाप्र महिलांसाठी तर वाखरी आणि भाळवणी हे नामाप्र (खुला) जागेसाठी निश्चित झाले आहेत.

​अनुसूचित जाती (SC) प्रवर्ग: अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकूण ३ जागा आरक्षित झाल्या आहेत. सुस्ते आणि पळशी हे गट अनुसूचित जाती महिलांसाठी तर खर्डी गट अनुसूचित जाती (खुला) जागेसाठी आरक्षित झाला आहे.




Post a Comment

Previous Post Next Post