रौप्य महोत्सवी पुस्तक लेखनाबद्दल गुरुप्रया श्री मालवणकर मॅडम यांना 'महर्षी वेदव्यास पुस्तक लेखिका पुरस्कार' प्रदान!
सोलापूर:
वास्तुमंत्र फाउंडेशनच्या वतीने दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सोलापूर येथे आयोजित एका विशेष समारंभामध्ये, यशस्वीरित्या २५ पुस्तके लिहिणाऱ्या लेखिका गुरुप्रया श्री मालवणकर मॅडम यांना मानाचा 'महर्षी वेदव्यास पुस्तक लेखिका पुरस्कार २०२५' देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या पुस्तकांच्या रौप्य महोत्सवी लेखन कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कैलासवासी वास्तुमहर्षी मग्गीरवार सर आणि कैलासवासी वास्तुमहर्षी धुनडीराज पाठक सर यांच्या पवित्र स्मृती निमित्ताने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी, सन्माननीय पंचांगकर्ते श्री. मोहन शास्त्री दाते, राष्ट्रीय मानवाधिकार संघटन सोलापूरचे अध्यक्ष श्री. सुरेश जी कावळे, श्री. गुड्ड्या स्वामी, अक्कलकोट आणि श्री. आचार्य डॉक्टर विजय महाजन यांच्या शुभहस्ते मालवणकर मॅडम यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पंचांग भास्कर आणि पत्रकारिता रत्न पुरस्काराचे वितरण:
याच समारंभामध्ये, पंचांगकर्ते श्री. मोहन शास्त्री दाते यांना त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल 'पंचांग भास्कर २०२५' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना यावेळी मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कळी माता मंदिर ट्रस्टी निलंगार समाज विश्वासू विश्वस्तश्री काळं पगार काका याना धर्मभास्कर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला
त्याचबरोबर, पंढरपूर येथील महाराष्ट्र Now 24 न्यूजचे संपादक श्री. नागेश विलास काळे यांना त्यांच्या उल्लेखनीय पत्रकारितेसाठी 'पत्रकारिता रत्न पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले.
या भव्य पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील विविध भागांतून विद्वान लोक उपस्थित होते. यामध्ये कोल्हापूर, सोलापूर, अक्कलकोट, धुळे, पुणे, बारामती, कुर्डूवाडी, पंढरपूर, तुळजापूर, धाराशिव, उमरगा, लातूर, गुलबर्गा आणि हैदराबाद अशा अनेक ठिकाणांहून आलेल्या मान्यवर आणि विद्वानांची उपस्थिती लक्षणीय होती.
या पुरस्कार सोहळ्यामुळे सोलापूरच्या साहित्यिक आणि ज्योतिष क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.







