लायन्स चिल्ड्रन्स पार्कचे पंढरपूर येथे उद्घाटन
पंढरपूर येथील लायन्स क्लब ऑफ पंढरपूर या क्लब तर्फे क्लब अध्यक्षा आरती बसवंती यांच्या नेतृत्वाखाली लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या स्वामी समर्थ केंद्र, परदेशी नगर व साई बाबा मंदिर, इसबावी या ठिकाणी दोन्ही चिल्ड्रन्स हेल्थ पार्कचे उद्घाटन अक्कलकोट येथील माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ला राजशेखर कापसे यांच्या हस्ते करण्यात आले. बसवंती मॅडम यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय मल्टिपल कौन्सिलचे सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी कापसे यांनी आपल्या मनोगतात लायन्स क्लबच्या माध्यमातून डोळ्याचे आजार कमी करणे, मधुमेह कमी करणे, लहान मुलांचे कर्क रोग कमी करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, लायन्स क्वेस्टच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे,अश्या अनेक विषयांवर लायन्स क्लब सेवाभावी वृत्तीने काम करत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, माजी नगरसेवक गणेश अधटराव, जेष्ठ लायन राजीव कटेकर, ला कैलास कारंडे, झोन चेअरमन ला विवेक परदेशी, सचिव ला ओंकार बसवंती, खजिनदार ला शोभा गुप्ता,ला सीमा गुप्ता, ला डॉ संध्या गावडे, ला डॉ मनोज भायगुडे, ला तेजश्री भायगुडे, ला अण्णासाहेब कोतली, सुरेश पडवळे,आर सी ऐनापुरे, जोतीराम भायगुडे, राजेंद्र माने, शंकर सुरवसे, विष्णुपंत देशमुख, प्रमोद पोतदार, प्रकाश परदेशी, दीपक कासट, डॉ धीरज पाटील, राजेंद्र गुप्ता, सतीश शेटे व दोन्ही परिसरातील मान्यवर नागरिक, लहान मुले उपस्थित होते.
Tags
Top news