ॲड. संदिप कागदे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
विधीक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ॲड संदिप कागदे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
पंढरपूर : येथील ॲड संदिप कागदे यांनी विधीक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल या कार्याची दखल घेऊन विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीने ॲड संदिप कागदे यांना प्रबुद्ध विधीज्ञ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित करण्यात आलेल्या खास कार्यक्रमात ॲड संदिप कागदे यांना प्रबुद्ध विधीज्ञ राज्यस्तरीय पुरस्कार माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, आमदार अभिजीत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल सावंत, शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक डी. राज सर्वगोड, नितीन काळे, अध्यक्ष विलास जगधने, सचिव अनिल ननावरे, श्रीकांत चंदनशिवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.ॲड संदिप कागदे यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.