पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्षपदी लखन साळुंखे तर उपाध्यक्षपदी नागेश काळे यांची निवड

0

 पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्षपदी लखन साळुंखे तर उपाध्यक्षपदी नागेश काळे यांची निवड


पत्रकार सुरक्षा समितीच्या तालुका अध्यक्षपदी श्री. दत्ताजीराव पाटील यांची निवड



        पंढरपूर प्रतिनिधी - पत्रकारांसाठी अहोरात्र झटणाऱ्या पत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर नूतन कार्यकारणीची निवड पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार व खालील मान्यवरांचे उपस्थितीत आज रोजी करण्यात आली. 

         यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ मार्गदर्शक श्री अतुल बहिरट सर, ज्येष्ठ पत्रकार  श्री नंदकुमार देशपांडे,  श्री अशोक डोळ सर, उद्योजक जयंत पुराणिक,  पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष श्री. रामचंद्र सरवदे, मावळते अध्यक्ष चैतन्य उत्पात उपस्थित होते.

         कार्यक्रमाच्या सुरुवातीला  मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आलेल्या प्रमुखआतिथींचा पंढरपूर सुरक्षा समितीच्या वतीने स्वागत व सन्मान करण्यात आला. तदनंतर नूतन सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

         प्रास्ताविक करताना पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष  श्री. रामचंद्र सरवदे यांनी संघटनेचे ध्येय धोरण व पत्रकारांवरील होणाऱ्याअन्यायाविरु द्ध केलेल्या आंदोलन उपोषणाबाबत माहितीदिली. 

        यावेळी मार्गदर्शन करताना श्री. अतुल बहिरट सर यांनी प्रिंट मीडिया व  डिजिटल मीडिया यात होत असलेल्या बदलांबद्दल सर्व पत्रकार बांधवांना मार्गदर्शन केले. श्री नंदू मामा देशपांडे यांनी पत्रकार क्षेत्रात कोणत्याही अडचणी आल्यास सर्व पत्रकार बांधवांच्या मदतीला धावून येण्याचे आश्वासन दिले. श्री अशोक डोळ सर यांनी पत्रकारांच्या समस्या व त्यावरील उपाय याबद्दल सडेतोड मार्गदर्शन केले.


         पंढरपूर शहर नूतन अध्यक्ष श्री. लखन साळुंखे यांचा सत्कार श्री. अतुल बहिरट सर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तर नूतन  उपाध्यक्ष श्री. नागेश काळे यांचा सत्कार उद्योजक श्री जयंत पुराणिक यांच्या शुभहस्ते करण्यात आला .

 पंढरपूर शहर व  कार्यकारणी पुढील प्रमाणे - 

चैतन्य उत्पात - जिल्हा समन्वयक 

 खानसाब मुलानी - जिल्हा उपाध्यक्ष पंढरपूर विभाग 

 शहराध्यक्ष - लखन साळुंखे, उपाध्यक्ष- नागेश काळे, कार्याध्यक्ष - बाहुबली जैन, सचिव - रवींद्र शेवडे, सहसचिव - विश्वास पाटील, खजिनदार - राहुल रणदिवे,  शहर समन्वयक - प्रकाश इंगोले, शहर संपर्कप्रमुख  - अशोक डोळसर, प्रसिद्धी प्रमुख - रामकृष्ण बिडकर, सदस्य - जयंत पुराणिक आदींची निवड करण्यात आली.

         तालुका अध्यक्षपदी - दत्ताजीराव पाटील, कार्याध्यक्ष - ज्ञानेश्वर शिंदे, सचिव - रोहित जाधव, सहसचिव  - पिंटू जाधव, खजिनदार - गणेश देशमुख, तालुका संपर्कप्रमुख - प्रदीप आसबे, प्रसिद्धी प्रमुख - संतोष चंदनशिवे, सदस्य - शांती भूषण झेंडे आदींची निवड करण्यात आली.


 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. रवींद्र शेवडे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री रामकृष्ण बिडकर यांनी केले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !