आ.समाधान आवताडे यांनी यात्रेसाठी तयारीचा घेतला आढावा

0

कासेगावात यल्लमा देवी यात्रेनिमित्त जय्यत तयारी


आ.समाधान आवताडे यांनी  यात्रेसाठी तयारीचा घेतला आढावा



यात्रा कालावधीत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही-आ समाधान आवताडे 


यात्रा उत्सवाच्या पूर्वसंध्येला आ आवताडे यांनी घेतली आढावा बैठक 


पंढरपूर प्रतिनिधी:कासेगाव( ता. पंढरपूर) येथील श्री यल्लामा देवीच्या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, पंजाब व आंध्र प्रदेश या राज्यातून लाखो भाविक भक्त येत असतात. या यात्रेसाठी प्रशासनाकडून विशेष तयारी सुरू असून काल पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे सदस्य आमदार समाधान आवताडे यांनी यात्रेतील तयारीचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून आमदार समाधान आवताडे यांनी गुरुवारी श्री यल्लमा देवीच्या मंदिर परिसर व विविध ठिकाणी भेट देऊन त्या त्या ठिकाणाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.यात्रा काळात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये तसेच भाविकांची लूटमार होणार नाही याकडे लक्ष द्यावे अशा सूचना त्यांनी पोलीस प्रशासनास केल्या. तसेच महावितरण अधिकारी यांनीही यात्रा काळात वीज पुरवठा खंडित होऊ नये याची काळजी घेण्याचा सूचना त्यांनी केल्या.सोबतच आरोग्य विभागातील अधिकारी यांची ही बैठक घेत त्यांनी यात्रा काळात कोणत्या भविकास काही त्रास झाल्यास अतिदक्षतेसाठी वैद्यकीय टीम तसेच रुग्णवाहिका राखीव ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिला.सोबतच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनाही ज्यादा बसेस सोडण्यात याव्या व भाविकांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष द्यावे. तसेच यात्रेतील भाविक भक्तांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये व स्वच्छतेसाठी दक्षता घ्यावी अशी सूचनाही पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी पंढरपूर तहसीलचे तहसीलदार सचिन लंगोटे पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशील संसारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मेटकरी साहेब व महावितरण विज कंपनीचे अधिकारी तसेच राज्य  परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि प्रशासनातील सर्व अधिकारी  उपस्थित होते यावेळी कासेगाव  ग्रामपंचायतीचे सरपंच शोभा भोसले उपसरपंच संग्राम सिंह देशमुख पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत भैया देशमुख तसेच भाजपा जिल्हा अध्यक्ष विजयसिंह दादा देशमुख अनिकेत देशमुख हनुमंत ताटे भीमा आबा भुसे नौशाद भाई शेख भास्कर घायाळ प्रकाश रुपनर केतन देशमुख सज्जन जाधव चंदू जाधव तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्राम विकास अधिकारी आर पी कोळी महसूल चे मंडलाधिकारी पंकज राठोड व तलाठी भाऊसाहेब अनिल बागल उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !