राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल सावंत यांना वसंतनाना देशमुख यांचा पाठिंबा

0

 राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल सावंत यांना वसंतनाना देशमुख यांचा पाठिंबा 

काँग्रेसच्या जम्बो कार्यकारणीचाही अनिल सावंत यांना पाठिंबा

मंगळवेढा /प्रतिनिधी 



      महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांना माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पंढरपूर तालुक्यातील दिग्गज नेते वसंतनाना देशमुख यांनी पाठिंबा दिला आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी ही यशस्वी शिष्टाई केली आहे. याशिवाय मंगळवेढा तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या जम्बो कार्यकारणीनेही अनिल सावंत यांना पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना हा धक्का मानाला जात आहे. 

वसंतनाना देशमुख हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. देशमुख यांनी खासदार शरद पवार यांची अनेकदा भेट घेऊन विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. वसंतनाना देशमुख यांना कासेगाव जिल्हा परिषद गटासह संपूर्ण पंढरपूर तालुक्यात म्हणणारा एक मोठा गट अस्तित्वात आहे. देशमुख यांच्या पाठिंब्याने अनिल सावंत यांना मोठे पाठबळ मिळणार असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात होत आहे. 

याचवेळी मंगळवेढा तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी अनिल सावंत यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे मतदार संघात अनिल सावंत यांना मोठे पाठबळ मिळाले आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होऊन राष्ट्रवादी पक्षातर्फे अनिल सावंत आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने भगीरथ भालके हे निवडणूक लढवीत आहेत. दोघात मैत्रीपूर्ण लढत होत असताना काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल सावंत यांना पाठिंबा दिल्याने मतदार संघात चर्चा होत आहेत.

यावेळी राहुल शहा, पांडुरंग जावळे, अशोक पवार, शिवाजी पवार, राजाराम जगताप, विजय देशमुख, दिलीप जाधव, शिवशंकर भांजे, बाबुराव पाटील चंद्रकांत पाटील संतोष गोवे मुबारक शेख, विकास मिटकरी लक्ष्मण गायकवाड विक्रम साखरे,नामदेव डांगे, पांडुरंग मेहकर,अशोक लेंडवे, दिलीप कौसाळे हे उपस्थित होते.


 खासदार शरद पवार यांनी अनिल सावंत यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली आहे. त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात येत्या चार ते पाच दिवसात अजून अनेक घडामोडी होतील. आणि खा.पवार  यांच्या सभेनंतर मतदारसंघातील चित्र पूर्ण पालटलेले दिसेल. अनिल सावंत हे विधानसभेची पहिली नक्कीच चढणार आहेत. 

- खासदार धैर्यशील मोहिते-पाटील


विधानसभा निवडणूक लागण्याआधी मी आणि वसंत नाना देशमुख दोघेही राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होतो. तसेच आम्ही खा.पवार यांना आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या आम्ही त्या उमेदवाराचे काम प्रामाणिकपणे करू असे सांगितले होते. त्यानुसार वसंतनाना देशमुख यांनी खासदार शरद पवार यांना दिलेला शब्द खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या साक्षीने पाळला आहे. तसेच खासदार मोहिते पाटील यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून मला काँग्रेस पक्षाच्या आणि कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. आगामी काळात या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचा त्यांना कधीही पश्चाताप होऊ देणार नाही. 

- अनिल सावंत 

उमेदवार महाविकास आघाडी

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !