अनिल सावंत यांना आमदार करा मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाचे नंदनवन करून शेतीला पाणी मिळवून देणार- खा.धैर्यशील मोहिते-पाटील
नवीन उद्योग सुरू करून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळवून देणार-अनिल सावंत
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ गावभेट दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद
सोलापूर प्रतिनिधी
शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत. अनिल सावंत आमदार झाले की दुष्काळी भागात पेशवाई राहणार नाहीत.महाविकास आघाडीने पंचसूत्री योजना राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये कृषी समृद्धी अंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाखापर्यत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच नियमित कर्ज फेडीसाठी 50,000 रु प्रोत्साहनराज्यातील सर्व नागरिकांना मोफत औषध व कुटुंब रक्षण 25 लाखांपर्यंत आरोग्य विभा मोफत देण्यात येणार आहे. महालक्ष्मी योजनेतून महिलांसाठी दरमहा 3000 रु महिला व मुलींसाठी मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.अनिल सावंत यांना आमदार करून आपण विधानसभेत पाठवावे, आमदार झाल्यानंतर या मतदारसंघात एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही व मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाचे नंदनवन करून शेतीला पाणी मिळवून देणार असे प्रतिपादन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी यावेळी केले.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचार्थ गावभेट दौऱ्यात आंधळगाव, भोसे, येथील आयोजित सभेत ते बोलत होते.यावेळी मंगळवेढ्यातील लवंगी या ठिकाणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.
यावेळी उमेदवार अनिल सावंत बोलताना म्हणाले की,गेल्या कित्येक वर्षापासून मंगळवेढा तालुक्यातील हा दुष्काळी भागातील पाणी प्रश्न असाच प्रलंबित पडला आहे.मला एकदा संधी देऊन बघा या भागातील पाणी प्रश्न आमदार झाल्यावर लगेच मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.मंगळवेढा तालुक्यातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. उद्योग कमी असल्यामुळे हजारो तरुण बेरोजगार आहेत. नवीन उद्योग सुरू करून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळवून देणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते राहुल शहा, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस फिरोज मुलाणी, शिवसेना शहरप्रमुख दत्तात्रय भोसले, माजी उपनगराध्यक्ष मुजफ्फर काझी, काशीनाथ पाटील, राजू मेथकुटे, लवंगीचे आप्पासाहेब माने, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष वृषाली इंगळे,आंधळगाव सरपंच लव्हाजी लेंडवे, माजी सरपंच तुकाराम चव्हाण, सागर गुरख, विजय बुरकुल, नानासो करपे, जमीर इनामदार, पंडीत गवळी, वृषाली इंगळे, माणीक गुंगे, आजी माजी ग्रा.पं सरपंच उपसरपंच, सदस्य आदीजन उपस्थित होते.