माढ्यासह राज्यात परिवर्तन अटळ - अभिजीत पाटील
(तुळशी येथे जाहीर सभा; तुळशीत एक वर्षाच्या आत पाणी आणू आणि तालुक्यातील सर्व रस्ते दोन वर्षात पक्के करू)
माढा तालुक्यातून अभिजीत पाटील यांना वाढता पाठिंबा
पंढरपूर/प्रतिनिधी
तीस वर्षे आमदारकी असतानाही तुळशी सारख्या गावात आजही पिण्याचे पाणी नाही,येथील मुलांची लग्ने जमत नाहीत. त्यामुळे पुढील एक वर्षाच्या आत तुळशीला पाणी तर आणुच पण दोन वर्षात मतदारसंघातील सर्व रस्ते पक्के करू, असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी दिले.
तुळशी (ता.माढा) येथे आयोजीत प्रचार सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष्याचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, हभप मधुकर नाईकनवरे, भारत पाटील, विजय भगत, सूरज देशमुख, दादासाहेब नाईक, शिवाजी मोरे, नागेश दगडे, बापूसाहेब दगडे, नारायण माळी, विशाल व्हनमाने, नामदेव खांडेकर, मोहित मोरे, मनोज शहा, बापूसाहेब गव्हाणे, विनायक वसेकर, संदीप कुलकर्णी, प्रमोद गव्हाणे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री.पाटील यांनी स्वतःच्या कामाचा अनुभव सांगताना बंद पडलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना ताब्यात घेऊन चालू करून दाखवला. एवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या उसाला जादा दर देण्यास सर्वांना भाग पाडले. त्यातून एकाच हंगामात तब्बल साडेआठशे कोटी रुपये ज्यादा
शेतकऱ्यांना मिळवून दिले. हे आपण शेतकऱ्यांचे दुःख जाणत असल्याने करू शकलो, असे सांगितले. आजपर्यंत जे-जे बोललो ते खरे करून दाखवले आहे. विरोधकांनी मात्र आधी शरद पवार साहेबांना धोका दिला आणि आता ऐन निवडणुकीत अजित दादांना धोका दिला आहे. त्यामुळे विकासकामांसाठी एकदा संधी द्या आणि 'आमदाराच्या पोरालाच पुन्हा आमदार करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पोराला आमदार करा' असे आवाहन त्यांनी केले.
सलग तीस वर्षे आमदारकी ताब्यात असतानाही यावेळी पक्षाने तिकीट का दिले नाही याचा विरोधकांनी आणि मतदारांनी विचार करावा असे सांगून आपल्याला शरद पवार साहेबांनी तिकीट दिले, आता जनता आमदार करणार असा विश्वास अभिजीत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. परिवर्तनासाठी शरद पवार साहेब आख्खा महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. महायुतीचे शासन राज्यात आणि केंद्रात सत्तेत असतानाही आरक्षणाचा प्रश्न जाणून बुजून चिघळत ठेवल्याचे श्री.पाटील म्हणाले. महाविकास आघाडीच्या सरकारने मात्र सत्तेत येताच जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असून सर्व जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय देण्याची भूमिका असल्याचे ते म्हणाले.
माढा तालुक्यातून वाढता पाठिंबा
जयंत पाटील यांच्या सभेप्रसंगी माढा तालुक्यातील अनेक गावांमधील स्थानिक नेत्यांनी अभिजीत पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला होता. आजही टेंभुर्णी येथे विधानसभा निवडणूकीच्या अनुषंघाने अमर पाटील यांच्या उपस्थितीत ऋषिकेश (बंटीनाना) बोबडे यांनी बैठक बोलावलेली होती. त्या बैठकीमध्ये सर्वांची मते जाणून घेऊन येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत (आबा) पाटील यांना सर्वानी एकमुखी पाठिंबा जाहीर केला. त्यावेळी माजी सरपंच प्रमोदजी कुटे, ऋषिकेश बंटीनाना बोबडे, डॉ.राहुल पाटील ,डॉ.सोमनाथ साळुंखे, संजय देशमुख, विनोद देशमुख, सचिन देशमुख,आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.