पं.शौनक अभिषेकी चि.अभेद अभिषेकी यांचा नवरात्री संगीत महोत्सवात रुक्मिणी मातेच्या चरणी स्वराभिषेक
अभिषेकी परीवाराकडून नवरात्रीतील अखंड २४ वी ही गायन सेवा विठ्ठल रुक्मिणी चरणी समर्पित
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
पंढरपूर:-श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने आयोजित सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्य आणि व्यवस्थापक मनोज श्रोत्री साहेब यांच्या अथक परिश्रमातून प्रतिवर्षाप्रमाणे श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवाच दुसर स्वरपुष्प पद्मश्री पं.जितेंद्र अभिषेकी यांचे सुपुत्र व शिष्य पं.शौनक अभिषेकी आणि अभेद अभिषेकी यांनी गुंफले.सुरुवातीला मंदिर समितीचे सदस्या शकुंतला नडगिरे मॅडम व्यवस्थापक मनोज श्रोत्री साहेब पं.शौनक अभिषेकी अभेद अभिषेकी सुधीर घोडके यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली सुरुवातीला अभेद अभिषेकी यांनी राग पुरीया कल्याण गात शास्त्रीय संगीताचा वारसाही जपण्यासाठी अभिषेकी परिवाराची पुढची पिढी तितकीच सुंदर गात असल्याचे दाखवून दिले.यानंतर पं.शौनक अभिषेकी यांच्या गायनाला सुरुवात झाली त्यांनी अभिजात भारतीय शास्त्रीय गायनातील राग अभोगी सादर करत प्रतिवर्षाप्रमाणे आई रुक्मिणी मातेच्या चरणी स्वरांचा स्वराभिषेक करत अमृताची फळे.आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी.घेई छंद मकरंद.हे सुरांनो चंद्रभा.शेवटी सर्वात्मका सर्वेश्वरा आणि त्यालाच जोडून कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर या सुंदर भैरवी ने कार्यक्रमाची सांगता करत सर्व पंढरपूरकर रसिक मोठ्या संख्येने शेवट पर्यंत श्रोत्यांनी भरभरुन प्रतिसाद देत सर्वांना मंत्रमुग्ध केले.त्यांना सुंदर साथसंगत तबला सुभाष कामत पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनिय उदय कुलकर्णी टाळ सुदर्शन कुंभार मुकुटराव भगत यांनी केली.तर सुत्रसंचलन विक्रम बिस्किटे सरांनी केले पुढेही ६ दिवस चालणाऱ्या या संगीत महोत्सवात ख्यातनाम गायक गायिका यांची उपस्थिती असणार असून दररोज सर्व रसिक श्रोत्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने करण्यात आले आहे.संगीत महोत्सव यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचारी अधिक परिश्रम घेत आहेत