महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची पंढरपूर तालुका कार्यकारिणी जाहीर
पंढरपूर ( प्रतिनीधी): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय प्रदेश सहसचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांचे मार्गदर्शनाखाली पञकार संघाची पंढरपूर तालुका कार्यकारिणी नुकतीच घोषीत करण्यात आली.
पंढरपूर येथील पत्रकार भवन याठिकाणी गु १२ सप्टेंबर गुरूवारी जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य यांचे उपस्थितीत नवीन पत्रकारांना संधी देऊन सभासदत्व बहाल करुन कार्यकारिणीची सर्वानुमते घोषणा करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष किरण जोशी यांचे सुचने नुसार महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाची पंढरपूर तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
यामध्ये पंढरपूर तालुकाध्यक्षपदी विठ्ठल जाधव, उपाध्यक्षपदी अमोल कुलकर्णी, यासह शहर कार्यकारीणीमधील रिक्त पदांवर कोषाध्यक्षपदी राजाभाऊ शहापूरकर, उपाध्यक्षपदी अविनाश साळुंखे, पत्रकार संघाचे तालुका प्रसिध्दी प्रमुख पदी विकास सरवळे याची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी हरिभाऊ प्रक्षाळे, दिनेश खंडेलवाल, अपराजित सर्वगोड, कल्याण कुलकर्णी यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे निवडीचे पत्र देऊन पुष्पहार घालून अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असून जनहितार्थ उपक्रम राबवून काम करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष विठ्ठल जाधव व राजाभाऊ शहापुरकर यांनी विश्वास दिला.
यावेळी विनोद पोतदार, सचिन माने, बाहुबली जैन, लखन साळुंखे, राजाभाऊ काळे, ज्ञानेश्वर शिंदे, अमोल माने उपस्थित होते.