भीमा सहकारी साखर कारखाना रोलर पूजन उत्साहात संपन्न

0
भीमा सहकारी साखर कारखाना रोलर पूजन उत्साहात संपन्न!!
गळीत हंगाम योग्य व नियोजनबद्ध होईल; ५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

प्रतिनिधी 

भीमा सहकारी साखर कारखाना लि; टाकळी सिकंदर, ता - मोहोळ, जि - सोलापूर या संस्थेच्या ४५ व्या गळीत हंगामाचा सन-२०२४-२५ साठीचा रोलर पूजनाचा कार्यक्रम राज्यसभा खासदार श्री.धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भीमा कारखान्याचे  चेअरमन विश्वराज महाडिक यांच्या शुभहस्ते गुरुवार - दि.०८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला.

आगामी गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात चांगले पाऊसमान अपेक्षित असल्याने ऊसाची उपलबद्धता मोठ्या प्रमाणावर होईल असा अंदाज आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात कारखान्याचे किमान ५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. यासाठी लागणारी ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा, मशिनरी ओव्हरहॉलिंगसह दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. अनेक अडथळ्यांवर मात करत कारखान्याची वाटचाल चालु आहे. येणारा गळीत हंगाम योग्य व नियोजनबद्ध पद्धतीने सर्व संचालक मंडळ व आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी व्यक्त केला. कारखान्याकडे हंगामपूर्व कामे वेळेत पूर्ण करून कारखाना गळीत हंगाम लवकरात लवकर चालू करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आपापल्या विभागाची कामे पूर्ण करावीत असे आवाहन त्यांनी केले.

सदर प्रसंगी मंगल ताई महाडिक, भीमा  कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश (आण्णा) जगताप, सर्व विद्यमान संचालक मंडळ, कार्यकारी संचालक  एस. जे. शिंदे, अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने सभासद, शेतकरी, कार्यकर्ते, उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !