माढ्याची २०२४ची दहीहंडी आपणच फोडणार अभिजीत पाटलांचं मोठं वक्तव्य
अभिजीत आबा पाटील मित्र परिवार माढा यांच्या वतीने माढा येथे आयोजन करण्यात आले
(प्रमुख आकर्षण म्हणून सिनेअभिनेत्री अक्षया देवधर यांची प्रमुख उपस्थिती)
(शिवशाही प्रतिष्ठान,माढा हा संघ ठरला विजेता)
प्रतिनिधी/-
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वतीने माढा येथे युवाशक्ती दहीहंडी उत्सव ठेवण्यात आलेला होता.
दहीहंडीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून सिने अभिनेत्री अक्षय देवधर यांची प्रमुख उपस्थिती होती. याच ठिकाणी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी आपल्या सर्वांच्या साथीने, सर्वांच्या प्रेमाने व आशीर्वादाच्या जोरावर आपणच येणारी २०२४ची विधानसभेची दहीहंडी फोडणार असल्याचे मोठे वक्तव्य अभिजीत पाटील यांनी केल्याने माढा तालुक्यात चर्चेला उधाण आहे.
सध्या गावोगावी अभिजीत पाटील यांची प्रचार यंत्रणा फिरत असून वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिजीत पाटील यांनी जनसंपर्क वाढवण्यावर जोर दिला असल्याचे पहावयास मिळत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी टेंभुर्णी येथे कुस्ती मैदानाच्या आखाड्यात कोणीही उमेदवार असू द्या त्याला चिटपट करायचे माहिती आहे असे वक्तव्य केले होते.
माढा युवाशक्ती च्या माध्यमातून झालेल्या दहीहंडीचा शिवशाही प्रतिष्ठान, माढा यांनी बक्षीस पटकावत मानाचा फेटा आणि रोख पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील राजाभाऊ चवरे, आनंद कानडे, शहाजी साठे, शिवाजी पाटील, ॲड.धनंजय चव्हाण,शंभू साठे, पंडित साळुंखे,
यू एफ जानराव, एड. विजय माने, निशांत पालकर, भाऊसाहेब महाडिक, अजिंक्य चव्हाण,पोपट आलदर, सज्जन पाटील, संदीप उमाटे , अच्युत उमाटे, ऋषिकेश तंबीले, संजय तांबिले, ज्ञानेश्वर बगडे, संजय भोगे, शिवाजी मुळे, नागेश इंगळे, दत्तात्रय पाटेकर, दादा नाईक, समाधान पाटील, शंभू चौरे, अमोल देशमुख, सतीश लटके, समाधान नागटिळक, दत्तात्रय पाटेकर, सागर शिंदे, पिंटू आतकरे, अभिजीत उबाळे, सागर बारबोले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक आबासाहेब साठे, जीतू जमदाडे, अक्षय शिंदे, सुयश मस्के व अभिजीत आबा पाटील मित्र परिवार माढा तालुका यांनी परिश्रम घेतले.